Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा धक्का, 3.5 रिश्टर स्केल इतकी नोंद

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा धक्का, 3.5 रिश्टर स्केल इतकी नोंद

सामना 4 months ago

हिंगोली जिल्ह्यात रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भूगर्भातून आवाज व सौम्य धक्का जाणवला आहे. सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात 3.5 रिश्टर स्केलवर झाली. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसराला लागून असलेले माळधामणी हे भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अधून मधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत.‌ या भूकंपाचा धक्का माळधामणीसह पांगरा शिंदे या गावांच्या आजूबाजूला जाणवला आहे.‌ प्राथमिक अहवालाच्या प्राप्त माहितीनुसार कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

जिल्हा प्रशासन सर्व परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी तसेच कोणतीही आपत्कालीन माहिती प्राप्त झाल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana