ठळक
इलेक्टोरल कॉलेज बायडेन यांना विजेता घोषित करूदे, मग मी व्हाईट हाऊस सोडतो!

इलेक्टोरल कॉलेज राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीतील जो बायडेन यांच्या विजयाची अधिपृत घोषणा करूदे, मग मी व्हाईट हाऊस सोडेन, असे सांगत अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडे अमेरिकेची सत्ता हस्तांतरित करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र या निवडणुकीत मला बायडेन यांनी नाही, तर निवडणूक प्रक्रियेतील घोटाळ्यांनी पराभूत केले आहे या माझ्या मतावर मी ठाम असल्याचे प्रतिपादन ट्रम्प यांनी केले आहे. थँक्स गिविंग डे निमित्त अमेरिकन जनतेला शुभेच्छा देताना ट्रम्प यांनी आपल्या मनातील खंत पुन्हा बोलून दाखवली.
डोनाल्ड ट्रम्प यांचा अलिकडेच झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. पण, डोनाल्ड ट्रम्प आपला हा पराभव मान्य करायला तयार नव्हते. निवडणुकीत आपला पराभव होतोय, हे लक्षात येताच त्यांनी कांगावा करत सर्वेच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र आता व्हाइट हाउस सोडण्याबाबत ट्रम्प यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. दरम्यान, इलेक्टोरल का@लेज मतांवर अखेरचा निर्णय घेण्यासाठी पुढील महिन्यात बैठक घेणार आहे. 14 डिसेंबर रोजी अमेरिकी इलेक्टोरल का@लेज बायडन यांच्या विजयाची घोषणा करण्याची शक्यता असून त्यानंतर 20 जानेवारी रोजी जो बायडेन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील अशी माहिती आहे.
…तर ती त्यांची मोठी चूक ठरेल
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोटाळा झालाय. हा एक उच्चस्तरीय घोटाळा आहे, असा पुनरुच्चार करीत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, जर इलेक्टोरल का@लेजने जो बायडन यांना विजेता म्हणून घोषित केलं तर ती त्यांची मोठी चूक ठरेल. हा प्रकार आशिया आणि आफ्रिका खंडातील अलिप्त राष्ट्रांतील निवडणुकीसारखा वाटतोय. या देशांत बऱयाचदा मतदानात घोटाळे करून एखादा पक्ष किंवा नेता सत्तेवर येण्याचे प्रकार घडतात. सर्वात मोठी अध्यक्षीय लोकशाही असणाऱया अमेरिकेत निवडणुकीत असे घोटाळे होणे आपल्याला भूषणावह नाही असेही मत ट्रम्प यांनी व्यक्त केले. अर्थात अमेरिकन निवडणूक प्रशासनाने मात्र ट्रम्प यांचा दावा फेटाळत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणताही घोटाळा झाला नसल्याचे स्पष्टीकरण केले आहे. बायडेन यांनी या निवडणुकीत ट्रम्प यांच्यावर 306 विरुद्ध 232 अशा मताधिक्याने विजय मिळवल्याची माहिती निवडणूक अधिकाऱयांनी दिली आहे.
अमेरिकेत हे काय चाललेय हेच कळत नाहीय. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन यांना 8 कोटीहून अधिक मते मिळाली आहेत यावर माझा आजही विश्वास बसत नाहीय. बायडेन यांनी ओबामांच्या मतांचा विक्रम मोडलाय हे माझ्या मनाला तरी पटत नाहीय.
n डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष