Sunday, 06 Oct, 10.40 am सामना

विदेश
इम्रान यांची घुसखोरीची कबुली, सीमा न ओलांडण्याचे पीओकेवासीयांना आवाहन

हिंदुस्थानने जम्मू आणि कश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर मानवतेच्या दृष्टिकोनातून कश्मिरी जनतेला सीमा ओलांडून भेटू नका असे आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पीओकेतील रहिवाशांना केले आहे. इम्रान यांनी याबाबत ट्विट केले असून या आवाहनामुळे हिंदुस्थानात एकप्रकारे घुसखोरी होत असल्याची कबुलीच त्यांनी दिली.

5 ऑगस्ट रोजी हिंदुस्थानने कश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर दोन्ही राष्ट्रांमधील ताण अधिक वाढला आहे. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत ठेवण्यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न सुरू आहेत, परंतु हिंदुस्थानने खडसावत हा देशांतर्गत विषय असून यात नाक खुपसू नये अशी तंबी पाकला दिली. पीओकेतील रहिवाशांनी कश्मिरी जनतेबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथे रॅली काढली अशी माहिती 'डॉन' या वृत्तपत्राने दिली होती. या रॅलीच्या दुसऱयाच दिवशी इम्रान खान यांनी पाकव्याप्त कश्मीरमधील रहिवाशांना सीमा न ओलांडण्याचे आवाहन ट्विटरद्वारे केले. पीओकेतील रहिवाशांचे सहकारी जम्मू आणि कश्मीरमध्ये राहतात अशा कश्मिरी जनतेच्या यातना मी समजू शकतो. अशा परिस्थितीत जम्मू आणि कश्मीरमधील जनतेला सीमा ओलांडून भेटणे हे हिंदुस्थानच्या पथ्यावर पडेल असे ट्विटरद्वारे त्यांनी म्हटले आहे.

इम्रान यांची पोस्ट योग्य नाही
याप्रकरणी हिंदुस्थानचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, इम्रान यांची ही पोस्ट योग्य नाही. गेल्या महिन्यात उनगा येथे भाषण देताना इम्रान म्हणाले होते की, हिंदुस्थानने कश्मीरातील अमानवी कर्फ्यू काढावा, तसेच फुटीरतावादी राजकीय नेत्यांना नजरकैदेतून सोडावे. इम्रान यांच्या या अशा वक्तव्यांमुळे आम्हाला आता असे वाटते की, इम्रान यांना आंतरराष्ट्रीय संबंध कसे जपावेत याबाबत माहिती नाही.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>