Friday, 12 Oct, 10.54 am सामना

ठळक बातम्या
#INDvWI. म्हणून पहिल्या दिवशी 90 नाही तर 95 षटकं टाकली गेली

सामना ऑनलाईन । हैदराबाद

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज संघातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर सुरू झाला. पहिल्या दिवशी असे काही घडले की प्रेक्षक अवाक झाले. कारण पहिल्या दिवशी 90 षटकं नाही तर 95 षटकांची गोलंदाजी झाली. या 95 षटकात वेस्ट इंडिजने 7 बाद 295 धावा केल्या आहेत.

पहिल्या दिवसाच्या 90 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर उमेश यादवने जेसन होल्डरला बाद केले. यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपला असे सर्वांना वाटले. काही जण तर मैदानातून बाहेर जाण्याची देखील तयारी करू लागले. परंतु याच वेळी वेस्ट इंडिजचा नववा खेळाडू देवेंद्र बिशू मैदानात येताना दिसला आणि सर्वच गोंधळात पडले. यामागे असे कारण सांगितले जात आहे की, पहिल्या दिवसाचा खेळ संपण्याची वेळ साडे चार होती. परंतु त्यापूर्वी 20 ते 25 मिनिटं आधी 90 वे षटक संपले. वेळ बराच बाकी असल्याने पंचांनी सामना पुढे सुरू ठेवण्याचे ठरवले आणि पहिल्या दिवशी आणखी पाच षटकं अधिकची टाकण्यात आली.

चेसने मैदानावर टाकला नांगर
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या विंडीजची सुरुवात खराब झाली. पॉवेल झटपट झाला. त्यानंतर टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी विंडीजवर जाळे फेकले आणि त्यात फलंदाज अलगद अटकत गेले. विंडीजची अवस्था एक वेळ सहा बाद 182 होती. परंतु यानंतर चेस आणि होल्डरमध्ये 100 षटकांची भागीदारी झाली. होल्डर 52 धावा काढून बाद झाला. चेस अद्यापही मैदानात शड्डू ठोकून असून शतकानजीक आहे. खेळ थांबला तेव्हा तो 98 धावांवर नाबाद होता.

Dailyhunt
Top