Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इंटरनेटच्या केबल्स झाडांच्या मुळांवर; झाडांचे संरक्षण करण्यासाठी ऑडिटची मागणी

इंटरनेटच्या केबल्स झाडांच्या मुळांवर; झाडांचे संरक्षण करण्यासाठी ऑडिटची मागणी

सामना 2 weeks ago

मुंबईत अनेक ठिकाणी इंटरनेट आणि ऑप्टिकल फायबर केबल्स झाडांच्या खोडांभोवती गुंडाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे झाडांचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे झाडांचे संरक्षण करण्यासाठी 'वृक्ष संजीवनी' अभियान राबवायचे, तर दुसरीकडे टेलिकॉम-केबल्स कंपन्यांकडून झाडांचा पायाभूत सुविधांसाठी आधार म्हणून वापर करायचा, या गंभीर विसंगतीचे पडसाद पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंगळवारी उमटले.

मुंबईतील विविध भागांमध्ये झाडांच्या खोडांभोवती केबल्स घट्ट गुंडाळणे, फांद्यांना केबल्स बांधणे, फांद्यांवर वायर लटकवणे तसेच खिळे, स्क्रू, क्लॅम्प किंवा इतर साधनांच्या माध्यमातून केबल्स झाडांना जोडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. यामुळे झाडांच्या सालीचे नुकसान, नैसर्गिक वाढीस अडथळा, गर्डलिंग, फांद्या कमकुवत होणे तसेच झाडांच्या छाटणी व देखभालीच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. मुंबईतील झाडे कोणत्याही खासगी टेलिकॉम किंवा केबल कंपनीची मालमत्ता किंवा युटिलिटी पोल म्हणून वापरली जात आहेत, यावर माजी नगरसेवक ॲड. सिद्धार्थ शर्मा यांनी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे तीव्र आक्षेप नोंदवला; तसेच मुंबईतील झाडांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana