Dailyhunt
IPL 2026 - चेन्नईला सूर सापडेना! सलग तिसऱ्या पराभवाची नोंद, RCB ने 43 धावांनी सामना जिंकला

IPL 2026 - चेन्नईला सूर सापडेना! सलग तिसऱ्या पराभवाची नोंद, RCB ने 43 धावांनी सामना जिंकला

सामना 1 week ago

यपीएल 2026 मधील या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना तुफानी खेळ दाखवत 3 विकेट्स गमावून तब्बल 250 धावा उभारल्या.

फिल सॉल्ट (46), देवदत्त पडीक्कल (50), रजत पाटीदार (नाबाद 48) आणि टीम डेविड (नाबाद 70) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे आरसीबीने मोठा स्कोर उभारला, तर विराट कोहलीने 28 धावांचे योगदान देत डावाला चांगली सुरुवात करून दिली.

या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची फलंदाजी पुन्हा एकदा ढासळली. सरफराज खान (50) आणि प्रशांत वीर (43) यांनी काही प्रमाणात लढत दिली, मात्र इतर फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने संपूर्ण संघ 207 धावांवर आटोपला. परिणामी, आरसीबीने 43 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि चेन्नईच्या वाट्याला सलग तिसरा पराभव आला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana