Dailyhunt
IPL 2026 - वर्ल्ड कप जिंकण्यासाठी क्लासेनला परत बोलवा; केविन पीटरसनचा दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाला सल्ला

IPL 2026 - वर्ल्ड कप जिंकण्यासाठी क्लासेनला परत बोलवा; केविन पीटरसनचा दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाला सल्ला

सामना 2 weeks ago

नरायझर्स हैदराबादचा धडाकेबाज फलंदाज हेनरिक क्लासेनने आयपीएलमध्ये पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगने सर्वांना थक्क केले आहे. बुधवारी (29 एप्रिल 2026) झालेल्या सामन्यात त्याने 30 चेंडूत नाबाद 65 धावांची खेळी करत हैदराबादला विजय मिळवून दिला.

त्याच्या या जबरदस्त खेळीनंतर इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाला (CSA) एक मोलाचा सल्ला दिला आहे. पीटरसनने ट्विट करत म्हटले की, दक्षिण आफ्रिकेने हेनरिक क्लासेनला फोन करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची विनंती करायला हवी.

पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेतच क्रिकेट वर्ल्ड कप रंगणार आहे. आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेला एकदाही विश्वचषक जिंकता आलेला नाही, हा इतिहास बदलण्यासाठी क्लासेनची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते, असे पीटरसनचे मत आहे. “दक्षिण आफ्रिकेने कधीही वर्ल्ड कप जिंकलेला नाही. त्यामुळे बोर्डाने क्लासेनशी संपर्क साधून त्याला पुढील वर्षीच्या मोहिमेत संघाचा मुख्य आधारस्तंभ बनवण्यासाठी मनवावे,” असे पीटरसनने आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. क्लासेनची सध्याची स्फोटक फॉर्म पाहता, तो दक्षिण आफ्रिकेचे नशीब बदलू शकतो, अशी चर्चा आता क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana