Dailyhunt
इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेचा लाजीरवाणा पराभव, इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा दावा

इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेचा लाजीरवाणा पराभव, इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा दावा

सामना 2 weeks ago

'इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेचा लाजीरवाणा पराभव झाला असून पर्शियन आखात आणि होर्मुझसाठी आता नवा अध्याय सुरू होत आहे,' असा दावा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनी यांनी आज केला.

पर्शियन आखातात अमेरिकेची जागा समुद्राच्या तळाशीच आहे, असेही त्यांनी ठणकावले.

खामेनी यांचा संदेश इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. इराणच्या विजयाची घोषणाच खामेनी यांनी केली. 'पर्शियन आणि ओमानच्या आखातातील देशांचे आणि आमचे भवितव्य एकच आहे. हव्यासापायी आणि दुष्टबुद्धीने हजारो किलोमीटर दूरवरून येणाऱ्या परकीयांना येथे कोणतेही स्थान नाही. अल्लाहच्या कृपेने पर्शियन आखाताचे भविष्य उज्ज्वल असेल आणि त्यात अमेरिकेला स्थान नसेल,' असे खामेनी म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana