Dailyhunt
Israel Lebanon Strikes होर्मुझ पुन्हा बंद! लेबनानवरील इस्रायली हल्ल्यांनंतर इराणचा निर्णय, तणाव वाढणार?

Israel Lebanon Strikes होर्मुझ पुन्हा बंद! लेबनानवरील इस्रायली हल्ल्यांनंतर इराणचा निर्णय, तणाव वाढणार?

सामना 1 week ago

मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्धविराम जाहीर केल्यानंतर २४ तासांच्या आतच, इराणने लेबनानवरील इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' पुन्हा बंद केली आहे, असे वृत्त असोसिएटेड प्रेसने (AP) स्थानिक प्रसारमाध्यमांच्या हवाल्याने दिले आहे.

बुधवारी पहाटे अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर झाला होता, ज्याचा भाग म्हणून इराणने जागतिक ऊर्जा पुरवठा सुरळीत करण्यासाठी हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास संमती दिली होती. मात्र, त्यानंतर लगेचच इस्रायली लष्कराने लेबनॉनमध्ये अवघ्या १० मिनिटांच्या कालावधीत १०० हून अधिक हवाई हल्ले केले.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणसोबतच्या युद्धविरामाच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला उघड पाठिंबा दिला असला तरी, या युद्धविरामात लेबनॉनचा समावेश नसल्याचे आधीच स्पष्ट केले होते.

नेतान्याहू यांच्या पंतप्रधान कार्यालयाने ‘X’ वर लिहिले की, ‘इराणने तात्काळ सामुद्रधुनी उघडण्याच्या आणि अमेरिका, इस्रायल व या प्रदेशातील देशांवरील हल्ले थांबवण्याच्या अटीवर, ट्रम्प यांच्या निर्णयाला इस्रायलचा पाठिंबा आहे.’ मात्र, दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, ‘दोन आठवड्यांच्या या युद्धविरामात लेबनॉनचा समावेश नाही.’

इस्रायलने लेबनॉनमध्ये हिजबुल्ला विरुद्ध आपली लष्करी मोहीम सुरूच ठेवली असून, यामध्ये ११२ लोक मारले गेले तर ८३७ जण जखमी झाले आहेत. या प्रकारामुळे इराणने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अमेरिकेची प्रतिक्रिया

युद्धविराम होऊनही सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला हा जलमार्ग बंद झाल्याच्या वृत्तानंतर, अमेरिकेने बुधवारी म्हटले आहे की इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी ‘त्वरित आणि सुरक्षितपणे’ खुली केली पाहिजे. व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘समुद्रधुनी बंद करणे हे स्वीकार करण्यासारखे नाही.’

इस्रायलचा लेबनानवर भीषण हल्ला; २५४ जणांचा मृत्यू

ट्रम्प यांचा इस्रायलच्या लेबनानमधील हल्ल्यांना पाठिंबा

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आज लेबनानमधील इस्रायलच्या लष्करी कारवाईचे समर्थन केले. वॉशिंग्टन आणि तेहरानमध्ये झालेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामात हिजबुल्लाचा समावेश नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानचा ‘तो’ दावा इस्रायलने तातडीने खोडून काढला; युद्धविरामाबाबत स्पष्ट केली भूमिका

‘पीबीएस न्यूज’शी बोलताना ट्रम्प यांना विचारण्यात आले की, युद्धविराम होऊनही लेबनॉनला लक्ष्य का केले जात आहे? त्यावर ते म्हणाले, ‘हो, त्यांचा (लेबनान/हिजबुल्ला) या करारात समावेश नव्हता. ते हिजबुल्लामुळे आहे… त्याचीही काळजी घेतली जाईल. सर्व ठीक आहे.’ इस्रायली सैन्याकडून लेबनानमध्ये हल्ले करत राहण्यावर तुमची संमती आहे का, असे विचारले असता ट्रम्प म्हणाले, ‘हा कराराचाच भाग आहे – हे सर्वांना माहित आहे. ती एक वेगळी लढाई आहे.’

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana