Dailyhunt
इस्रायलचा लेबनानवर भीषण हल्ला; २५४ जणांचा मृत्यू

इस्रायलचा लेबनानवर भीषण हल्ला; २५४ जणांचा मृत्यू

सामना 3 weeks ago

लेबनान आणि इस्रायलमधील संघर्ष आता अत्यंत भीषण वळणावर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत इस्रायलने केलेल्या जोरदार हल्ल्यात लेबनानमध्ये २५४ लोकांचा बळी गेला असून ७०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने ही धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. लेबनानच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील सर्व रुग्णालये जखमींनी भरली असून आरोग्य यंत्रणा कोलमडण्याच्या स्थितीत आहे.

या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भूमिका स्पष्ट केली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले की, अमेरिका आणि इराण दरम्यान झालेल्या अलीकडील युद्धबंदी कराराचा लेबनानमधील परिस्थितीशी कोणताही संबंध नाही. लेबनानमधील लष्करी कारवाई या कराराच्या कक्षेबाहेर असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

दुसरीकडे इराणने या हल्ल्यांवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. इराणची वृत्तसंस्था 'तस्नीम'ने दिलेल्या माहितीनुसार, जर लेबनानवर होणारे इस्रायली हल्ले थांबले नाहीत, तर इराण विद्यमान युद्धबंदी करारातून माघार घेईल. इराणच्या या धमकीमुळे येणाऱ्या काळात हा संघर्ष अधिक व्यापक होऊन इराण थेट युद्धात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana