Dailyhunt
Jammu Kashmir - रामबन जिल्ह्यात भूस्खलन, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद

Jammu Kashmir - रामबन जिल्ह्यात भूस्खलन, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद

सामना 1 week ago

म्मू कश्मीरमधील रामबन जिल्ह्यात करोल ब्रिज ते चंदरकोट दरम्यान रविवारी रात्री भूस्खलनाची घटना घडली. यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. महामार्गावर दोन्ही बाजूच्या लेनवर दगड आणि चिखल असल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत खबरदारीचा उपाय म्हणून बाधित भागातील वाहतूक थांबवली. महामार्गाच्या दुरुस्ती कामाबाबत आणि तो पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्याबाबतच्या पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana