Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जर्मनीच जगज्जेता; एकमेव गोलाच्या जोरावर ठोकला विश्वविजयी चौकार

जर्मनीच जगज्जेता; एकमेव गोलाच्या जोरावर ठोकला विश्वविजयी चौकार

सामना 1 week ago

44 मिनिटेमैदानावरगोलचादुष्काळहोता. दोन्हीसंघांचीझुंजशिगेलापोहोचलीहोतीआणिमगआलातोऐतिहासिकक्षण. मायकेलस्टथॉफनेमिळालेल्यासंधीवरअसाघावघातलाकी, स्पेनच्याविश्वविजेतेपदाच्यास्वप्नांचीअक्षरशः राखरांगोळी झाली . त्या एकमेव गोलच्या जोरावर जर्मनीने स्पेनला 1-0 असे नमवत पुरुष हॉकी विश्वचषकावर पुन्हा आपली मोहोर उमटवली . आपणच जगज्जेते असल्याचे दाखवून देत आपले विश्वविक्रमी चौथे जेतेपद पटकावले .

दोनक्वार्टरगोलशून्य, मगतिसऱ्यातजर्मनीचाबॉम्ब

पहिल्या दोन क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी एकमेकांच्या बचावाची अक्षरशः परीक्षा घेतली. गोलरक्षक आणि बचावपटूंच्या भक्कम खेळामुळे मध्यंतरापर्यंत स्कोअरबोर्डवर शून्यच होता. मात्र 44व्या मिनिटाला स्टथॉफने मैदानी गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिली. त्या आघाडीची बरोबरी साधण्याचे स्पेनने सर्वस्व पणाला लावले, पण जर्मनीने त्यांना आपल्या गोलजाळय़ाजवळ फिरकूच दिले नाही. त्यामुळे तो एकमेव गोल इतिहासाची बरोबरी साधणारा ठरला.

स्पेनचेचारपेनल्टीकॉर्नर; पणगोलचादुष्काळच

स्पेनकडे बरोबरी साधण्याच्या संधी होत्या. तो अनेकदा गोलच्या जवळ पोहोचला. मात्र निर्णायक क्षणी त्यांचे पेनल्टी कॉर्नर फोल ठरले. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी जर्मनीच्या किल्ल्यावर धडक दिली, पण जर्मन बचाव अभेद्य राहिला. ते जर्मनीची भिंत पाडण्यात अपयशी ठरले आणि तिसऱयांदा अंतिम फेरीत पोहोचूनही स्पेनला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत पोहचूनही तिसऱयांदाही उपविजेता राहिलेला स्पेन एकमेव संघ आहे.

पाकिस्तानच्याचौकाराचीबरोबरी

या विजयासह जर्मनीने आपल्या जगज्जेतेपदाला चारचांद लावले. त्यांनी चौथ्या विश्वविजयी कामगिरी करत सर्वाधिक चार पुरुष विश्वचषक जिंकणाऱया पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी केली. 2002, 2006 आणि 2023 नंतर जर्मनीने 2026 मध्ये पुन्हा सुवर्णमुकुट काबीज केला. आता विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानच्या बरोबरीने चार वेळा जगज्जेता ठरलेला जर्मनी दुसराच आहे.

डचसाम्राज्यालाअर्जेंटिनाचाधक्का!

नऊ वेळच्या जगज्जेत्या नेदरलँड्सचे वर्चस्व संपुष्टात आणत अर्जेंटिनाने महिला हॉकी विश्वचषकावर तिसऱयांदा नाव कोरण्याचा पराक्रम केला. थरारक अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने नेदरलँड्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-1 असा पराभव केला. निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल शूटआऊटमध्ये लागला. नेदरलँड्सने आक्रमक सुरुवात केली. दुसऱया क्वार्टरच्या अखेरीस मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर यिब्बी यानसेनने अप्रतिम ड्रग फ्लिक करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात अर्जेंटिनाने आक्रमणाची धार वाढवली. 54 व्या मिनिटाला डच गोलरक्षकाच्या बचावातील चूक साधत अर्जेंटिनाची कर्णधार मारिया ग्रानाटोने रिबाऊंडवर गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत आणला. शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाकडून विक्टोरिया ग्रानाटो, ब्रिसा ब्रगेसेर आणि सोफिया काइरो यांनी गोल केले. नेदरलँड्सकडून केवळ वीन मारिनला यश आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana