Thursday, 16 Sep, 5.28 pm सामना

ठळक
झिरमिळ्यांची लटकन झटकन ,शिमरची फॅशन भाव खातेय

फॅशन सतत बदलत असते आणि जुनी फॅशन नव्याने परत येत असते. काळाआड गेलेली शिमरची फॅशन आता पुन्हा नवा साज घेऊन आलीय. त्यामुळे सध्या शिमरची फॅशन ट्रेण्डमध्ये असून अभिनेत्रींपासून तरुणींपर्यंत शिमरची फॅशन सध्या भाव खाऊन जातेयं.

नाईट पार्टीसाठी जात असताना नेमके कोणते कपडे घालायचे या संभ्रमात असाल तर शिमरी ड्रेस ट्राय करायला हरकत नाही. अलिकडे बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींच्या वॉर्डरॉबमध्ये शिमरचे ड्रेस हमखास पाहायला मिळतील. कारण शिमरी ट्रेण्ड असल्याने सध्या त्याची चलती आहे. नुकतीच अभिनेत्री रवीना टंडन एका पार्टीत काळ्या आणि सोनेरी रंगाच्या शिमर साडीत दिसली. तिच्या साडीतला तो फोटो भन्नाट व्हायरल झाला. शिमरच्या त्या साडीत ती आकर्षक आणि ग्लॅमरस दिसत होती. त्यामुळे स्टायलिश लूकसाठी शिमरचे ड्रेस ट्राय करायला हरकत नाही. नाईट पार्टीसाठी, लग्नसमारंभात शिमरचे ड्रेस बऱ्यापैकी तरुणी वापरत असल्याचे दिसून येत असल्याने शिमरचा भाव वधारलाय. जाणून घेऊया शिमरचा ट्रेण्ड

शिमरी गाऊन

एखाद्या पार्टीत ग्लॅमरस दिसायचे असल्यास शिमरी गाऊन सगळ्यात चांगला पर्याय आहे. अलिकडे अनेक अभिनेत्री शिमरी गाऊनमध्ये पार्टीत दिसून येतात. आकर्षक आणि हटके दिसण्यासाठी बॉडी फिट शिमर गाऊन ट्राय करु शकता. एवढेच नाही तर हाय स्लिट शिमरी गाऊन आकर्षक दिसण्यास मदत करते.

शिमर शॉर्ट ड्रेस

मित्रमंडळींसोबत पार्टीच्यावेळी शिमरचा शॉर्ट ड्रेस घालायला हरकत नाही. त्याने एक वेगळा लूक दिसतो. शिमरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अनेक डिझाईन्स आहेत. एवढेच नाही तर त्यांना वेगवेगळे रंगही आहेत. त्यामुळे बॉडी फिट शॉर्ट शिमरी ड्रेस उठून दिसतो. पार्टींसाठी या ड्रेसची निवड करायला हरकत नाही.

शिमरी साडी

महिलांसाठी साडी आवडता पेहराव आहे. अशावेळी शिमरच्या साडीचा ट्रेण्ड सुरु झाालाय. समारंभांमध्ये शिमरी साडीचा लूक नक्कीच साऱ्यांचे लक्ष वेधून घेईल.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top