Wednesday, 05 Aug, 4.44 pm सामना

देश
जियोचा ग्राहकांना धक्का, तीन रीचार्जमध्ये टॉकटाईम केला कमी

जियोने आपल्या ग्राहकांना एक धक्का दिला आहे. तब्बल तीन रीचार्जमध्ये जियोने टॉकटाईम कमी केला आहे. जियोने याची कुठलीही अधिकृत घोषणा केली नाही परंतु जियोच्या वेबसाईटवर याचे तपशील दिसत आहेत.

जियोने आंतरराष्ट्रीय सबस्क्राईबर डायलिंग आणि आंतरराष्ट्रीय रोमींग प्रीपेड रीचार्जमध्ये घट केली आहे. जियोच्या 501 रुपयांच्या आयएसडी रीचार्जमध्ये, 1 हजार 1 आणि 1 हजार 201 रुपयांच्या आंतरराष्ट्रीय रोमिंगमध्ये बदल केले आहेत. 501 रुपयांचा आयएसडी रीचार्ज केल्यास ग्राहकांना आता 424.58 रुपयांचा टॉकटाईम मिळणार आहे. तर या रीचार्जची वैधता 28 दिवस इतकी असणार आहे. या रीचार्जमध्ये जियो कंपनीने 124.42 रुपयांचा टॉकटाईम कमी केला आहे. यापूर्वी 501 रुपयांच्या रीचार्जमध्ये ग्राहकांना 551 रुपयांचा टॉकटाईम मिळायचा.

एक हजार 1 आणि 101 हजार 201 रुपयांच्या रीचार्जमध्येही जियोने टॉकटाईम कमी केला आहे 1 हजार 101 च्या रीचार्जमध्ये ग्राहकांना पूर्वी 1 हजाअर 211 रुपयांचा टॉकटाईम मिळायचा. आता जियोने तो कमी करून 933 रुपये केला आहे. तसेच 1 हजार 201 च्या रिचार्जमध्ये ग्राहकांना 1 हजार 321 रुपयांचा रिचार्ज मिळायचा आता तो कमी होऊन 1 हजार 17 रुपये करण्यात आला आहे.

हा बदल जियोने नेमका कधी केला हे कळालेले नाही कारण कंपनीने याची अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच यापोर्वी 149 च्या रिचार्जमध्येही कंपनीने 28 दिवसांची वैधता कमी करून 24 दिवस केली होती.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top