Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जोकोविच पहिल्या फेरीत आऊट

जोकोविच पहिल्या फेरीत आऊट

सामना 2 weeks ago

ब्बल 24 ग्रँडस्लॅमचा धनी असलेल्या नोवाक जोकोविचचे विक्रमी 25व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाचे स्वप्न यूएस ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत भंगले. जागतिक क्रमवारीत 49व्या स्थानी असलेल्या अर्जेंटिनाच्या मारियानो नवोनेने तब्बल 4 तास 36 मिनिटे रंगलेल्या पाच सेटच्या झुंजीत जोकोविचचा प्रतिकार 7-6, 5-7, 4-6, 6-2, 6-1 असा मोडून काढला.

जोकोविचने सुरुवातीच्या तीनपैकी दोन सेट जिंकत सामन्यावर पकड मिळवली होती, मात्र अखेरच्या दोन सेटमध्ये 25 वर्षीय नवोनेने जबरदस्त पुनरागमन करत अनुभवी जोकोविचला अक्षरशः झुंजवले आणि सामना खिशात घातला. या पराभवानंतर जोकोविच भावूक झाला. मैदानावरच त्याला अश्रू अनावर झाले. 'यूस ओपन'च्या इतिहासात जोकोविच प्रथमच पहिल्या फेरीत गारद झाला आहे. तसेच 2006च्या ऑस्ट्रेलियन ओपननंतर प्रथमच तो कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभूत झाला आहे, हे विशेष.

नवोनेचा ग्रँडस्लॅम प्रवास

27 फेब्रुवारी 2001 रोजी जन्मलेल्या मारियानो नवोनेने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून टेनिस खेळण्यास सुरुवात केली. 2024च्या फ्रेंच ओपनमध्ये त्याला 31वे मानांकन मिळाले होते. याच स्पर्धेतून त्याने ग्रँडस्लॅम पदार्पण केले. आता 24 ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोविचला पहिल्याच फेरीत नमवत त्याने कारकीर्दीतील सर्वात मोठा विजय नोंदवला.

मेदवेदेवची विजयी सलामी

दरम्यान, रशियाच्या डॅनियल मेदवेदेवने 'यूएस ओपन'च्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याने ह्यूगो गॅस्टनचा 6-4, 6-2, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. हा सामना 2 तास 14 मिनिटे चालला. मेदवेदेवने या विजयासह कारकीर्दीत आठव्यांदा 'यूएस ओपन'च्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

व्हिनस विल्यम्स पहिल्याच फेरीत पराभूत

चार वेळची ऑलिम्पिक विजेती व्हिनस विल्यम्सही यूस ओपन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत सलामीच्या लढतीतच पराभूत झाली. अमेरिकेच्याच सोफिया केनिनने व्हिनसला 6-2, 7-6 (8-6) असे पराभूत करत दुसऱ्या फेरीत धडक मारली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana