Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कल्याण लोकसभेच्या जिल्हाप्रमुखपदी शरद पाटील, अभिजित सावंत यांची नियुक्ती

कल्याण लोकसभेच्या जिल्हाप्रमुखपदी शरद पाटील, अभिजित सावंत यांची नियुक्ती

सामना 2 weeks ago

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना कल्याण लोकसभेतील जिल्हाप्रमुख जाहीर करण्यात आले आहेत.

कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि अंबरनाथ विधानसभा क्षेत्राच्या जिल्हाप्रमुखपदी शरद पाटील तर डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि कळवा-मुंब्रा या विधानसभा क्षेत्राच्या जिल्हाप्रमुखपदी अभिजित सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

डोंबिवलीपश्चिमशहरप्रमुखपदीसुरेशपरदेशी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना डोंबिवली पश्चिम शहरप्रमुखपदी सुरेश परदेशी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana