Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान कोसळले, अपघातात वैमानिक आणि सहवैमानिकाचा मृत्यू

कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान कोसळले, अपघातात वैमानिक आणि सहवैमानिकाचा मृत्यू

सामना 1 week ago

त्तर प्रदेशातील कानपूर येथे गुरुवारी एक प्रशिक्षण विमान कोसळले. या अपघातात विमानातील पायलट आणि को-पायलट यांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकांनी घटनास्थळी दाखल होत बचाव आणि मदतकार्य सुरु केले.

कानपूरमधील गंगा बॅरेजजवळ ही दुर्घटना घडली.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, हे प्रशिक्षण विमान गर्ग एव्हिएशनच्या मालकीचे असून नाथा खेडा परिसरात प्रशिक्षण उड्डाणावर असताना कोसळले. स्थानिक रहिवाशांनी अग्निशमन दलाला अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच कानपूरचे मुख्य अग्निशमन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलासोबतच कानपूर नगर आपत्कालीन सेवेची पथकेही घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले.

कोसळलेल्या विमानाच्या ढिगाऱ्यातून दोन जणांना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले. दोघांनाही उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताचे कारण अद्याप कळले नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana