Thursday, 14 Oct, 1.45 pm सामना

ठळक
कार्तिक आर्यन बनतोय शहजादा, 'या' चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार

दिग्दर्शक रोहित धवनच्या आगामी 'शेहजादा' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कृती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

भूषण कुमार, अल्लू अरविंद आणि अमन गिल निर्मित हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात परेश रावल, मनीषा कोईराला, रोनित रॉय आणि सचिन खेडेकर हेही अभिनय करताना दिसणार आहेत. मुंबई आणि दिल्लीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण केले जाणार आहे.

शेहजादा हा चित्रपट दाक्षिणात्य कलाविश्वातील सर्वात स्टायलिस्ट अभिनेता म्हणून ओळखला जाणारा अल्लू अर्जुन याच्या 'अला वैकुंठपुरमुलु'चा रिमेक आहे. हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता. दरम्यान, कार्तिकने याआधी अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठपुरमुलु'मधील गाणे 'बुट्टा बोम्मा'वर एक डांस व्हिडीओ शेअर केला होता. आता अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाप्रमाणेच 'शेहजादा'ही पडद्यावर कमाल करणार का? हे पाहावं लागेल.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top