Tuesday, 27 Aug, 4.40 am सामना

विदेश
कश्मीरचा मुद्दा सोडा, POK वाचवण्याचा प्रयत्न करा; बिलावल भुट्टोची चिंता

आंतरराष्ट्रीय पातळीवर कश्मीर राग आळवून तसेच कश्मीरी जनतेच्या मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचा कांगावा करुनही पाकिस्तान जगासमोर तोंडघशी पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर पाकड्यांचे अवसानच गळाले आहे. त्यामुळे आता कश्मीर प्रश्न सोडून आपल्या ताब्यात असलेल्या POK म्हणजेच पाकव्याप्त कश्मीरला वाचवण्याचे प्रयत्न करण्याची गरज पाकिस्तान पिपल्स पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी व्यक्त केली आहे.

कश्मीरमधून कलम 370 रद्द झाल्यानंतर पाकिस्तानची तंतरली आहे. या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्याचे पाकड्यांचे सर्व प्रयत्न फसले आहेत. तसेच कलम 370 रद्द करण्याच्या प्रस्तावात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असून लवकरच ते हिंदुस्थानात असेल असे ठणकावून सांगितले होते. त्यामुळे पाकिस्तान पिपल्स पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी मंगळवारी पाकिस्तानची खरी भीती बोलून दाखवली आहे. आतापर्यंत आपण कश्मीर मुद्द्यावर बोलत होतो. आता आपल्याला पाकव्याप्त कश्मीर म्हणजे मुझफ्फराबाद आपल्याकडेच राखण्याची योजना आखायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अण्वस्त्र हल्ल्याची दर्पोक्ती करणाऱ्या पाकड्यांची खरी भीती जगासमोर आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top