Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
काउंटीत धुमाकूळ घालण्यासाठी आकिब नबी सज्ज, जम्मू-कश्मीरचा 'रॉकेट' आता सरेच्या मैदानात

काउंटीत धुमाकूळ घालण्यासाठी आकिब नबी सज्ज, जम्मू-कश्मीरचा 'रॉकेट' आता सरेच्या मैदानात

सामना 1 week ago

णजी करंडकात आपल्या वेगाने फलंदाजांची भंबेरी उडवणारा जम्मू-कश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी आता इंग्लंडमध्ये आपली धार आजमावणार आहे. नबीला इंग्लंडचा व्हिसा मिळाला असून तो रविवारी नवी दिल्लीहून इंग्लंडकडे रवाना झाला आहे.

सर्व काही सुरळीत पार पडले तर 2 सप्टेंबरपासून द ओव्हलवर काउंटी क्रिकेटमध्ये यॉर्कशायरविरुद्धच्या सामन्यात तो सरेच्या जर्सीत दिसू शकतो.

रणजीत 60 विकेटअन्जम्मूकश्मीरलाबनवलेपहिल्यांदाचॅम्पियन

मागील रणजी हंगामात नबीने अक्षरशः कहर केला. 12.56च्या सरासरीने तब्बल 60 विकेट घेत तो स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याच्या धारदार माऱयामुळे जम्मू-कश्मीरने इतिहास रचत पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीवर नाव कोरले. या कामगिरीनंतर नबीकडे हिंदुस्थानी क्रिकेटच्या भविष्यातील वेगवान गोलंदाजीचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

श्रीलंकेविरुद्ध 1-0ने मालिका जिंकणाऱया हिंदुस्थानी कसोटी संघातही त्याचा समावेश होता, मात्र दोन्ही सामन्यांत त्याला अंतिम अकरात स्थान मिळाले नाही.

इंग्लंडमध्येहोणार 'स्विंगटेस्ट

नबीचा काउंटी दौरा केवळ अनुभवासाठी नाही तर टीम इंडियाच्या भविष्यातील तयारीचा भाग मानला जात आहे. इंग्लंडमधील वातावरण, खेळट्टय़ा आणि लाल कुकाबुरा चेंडूवर नबी किती प्रभावीपणे स्विंग मिळवतो, याकडे भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीचे लक्ष असेल. आगामी न्यूझीलंड दौऱयातही सीम आणि स्विंगला अनुकूल परिस्थिती अपेक्षित असल्याने हा अनुभव नबीसाठी मोठी शिदोरी ठरणार आहे. सरेसाठी नबीला यॉर्कशायर, ससेक्स आणि ग्लॅमरगनविरुद्ध तीन सामने खेळण्याची संधी मिळू शकते.

काउंटीमध्ये हिंदुस्थानींची'फौज'

इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये सध्या हिंदुस्थानी खेळाडूंचीही जोरदार उपस्थिती आहे. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत 16 विकेट घेणारा डावखुरा फिरकीपटू मानव सुथार वॉरविकशायरकडून पुन्हा खेळणार आहे, तर डावखुरा मनगटी फिरकीपटू कुलदीप यादव यॉर्कशायरकडून पुनरागमन करणार आहे. सरेच्या ताफ्यात लेगस्पिनर राहुल चाहर आणि महिपाल लोमरोरही आहेत.

नंतरहिंदुस्थानसाठीखेळणार

नबीचा इंग्लंडमधील मुक्काम संपल्यानंतर तो हिंदुस्थान अ संघात दाखल होण्याची शक्यता आहे. 22 सप्टेंबरपासून पुद्दुचेरीत ऑस्ट्रेलिया 'ए'विरुद्ध दोन रेड-बॉल सामने होणार आहेत. मात्र त्यानंतर जम्मू-कश्मीरकडून 1 ते 5 ऑक्टोबरदरम्यान होणाऱया इराणी कपमध्ये खेळणे त्याच्यासाठी वेळापत्रकामुळे कठीण ठरू शकते. दरम्यान, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार यांच्याही काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या दोघे दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात पूर्व विभागाकडून खेळत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana