Dailyhunt
केदारनाथ धाम यात्रेचे बजेट महागले, पालखीपासून हेलिकाॅप्टरचा खर्च वाढला

केदारनाथ धाम यात्रेचे बजेट महागले, पालखीपासून हेलिकाॅप्टरचा खर्च वाढला

सामना 1 day ago

केदारनाथ धामला जाणाऱया भाविकांना आता यापुढे थोडे जास्तीचे पैसे खर्च करण्याची तयारी ठेवावी लागेल. पायी मार्गावरून जाणाऱया घोडा, खेचर आणि पालखीच्या किमतीत 10 ते 15 टक्के वाढ झाली असून हेलिकाॅप्टरच्या खर्चातही वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने उत्तराखंडमधील खासगी टॅक्सी व बसच्या भाडय़ातही वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण केदारनाथ धामचे बजेट भाविकांना आधीच्या तुलनेत आता महाग होणार आहे.

उत्तराखंड सरकारने केदारनाथसह चारही धामांसाठी नोंदणीसाठी कोणतेही शुल्क ठेवले नाही. भाविकांना अधिपृत वेबसाईटवरून तसेच मोबाईल अॅपवरून फ्रीमध्ये स्लॉट बुक करता येतील. मंदिरात दर्शनासाठीही कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

हेलिकाॅप्टरचे भाडे

  • सिरसी-केदारनाथ-3043 रु.
  • फाटा-केदारनाथ-4840 रु.
  • गुप्तकाशी-केदारनाथ-6077 रु.
  • राऊंड ट्रीप (ये-जा)12500 रु.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana