Dailyhunt
केदारनाथ हेलिकॉप्टर बुकिंग शुक्रवारपासून

केदारनाथ हेलिकॉप्टर बुकिंग शुक्रवारपासून

सामना 1 week ago

शुक्रवारपासून किंवा 12 एप्रिलपासून केदारनाथ धामसाठी हेलिकॉप्टर सेवेच्या बुकिंगला सुरुवात होईल, अशी घोषणा उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरण (यूकाडा)चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. आशीष चौहान यांनी केली आहे.

तिकिटांचा काळाबाजार आणि फसवणूक रोखण्यासाठी यूकाडाने या वेळी 100 टक्के ऑनलाइन तिकीट प्रणालीचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.

मागील वेळेप्रमाणे या वेळीही बुकिंगची जबाबदारी आयआरसीटीसी कडेच राहील. ऑफलाइन तिकिटाची कोणतीही तरतूद नसेल, जेणेकरून प्रवाशांना दलालांपासून वाचण्यास मदत होईल. प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि हिमालयीन प्रदेशातील अनिश्चित हवामान लक्षात घेता बुकिंग स्लॉटमध्ये विभागली गेली आहे. सुरुवातीला 20-20 दिवसांच्या स्लॉटसाठी तिकीट विक्री सुरू केली जाईल. हवामान आणि प्रवाशांच्या गर्दीचे मूल्यांकन केल्यानंतरच पुढील टप्प्यांची बुकिंग सुरू केली जाईल, असे ते म्हणाले. या वेळी एपूण आठ मार्गांवर हेलिकॉप्टर सेवा चालवल्या जातील, ज्यासाठी वेगवेगळ्या ऑपरेटरची निवड करण्यात आली आहे. यामध्ये चिप्सन एव्हिएशन, राजस एअरो स्पोर्टस्, थंबी एव्हिएशन, पिलग्रिमेज एव्हिएशन, युनायटेड हेली चार्टर्स, हिमालयन हेली सर्विसेस, ट्रान्सभारत एव्हिएशन आणि एअरो एअरक्राफ्ट यांचा समावेश आहे.

विशेष बाब म्हणजे यापैकी तीन कंपन्या पहिल्यांदाच चारधाम मार्गावर आपली सेवा देणार आहेत. मागील यात्रांमध्ये प्रवाशांना परतावा मिळण्यास झालेल्या विलंबावर यूकाडाने कठोर भूमिका घेतली आहे. परताव्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सोपी आणि वेगवान करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana