बाजारातून आणलेली केळी 2 दिवसांतच काळी पडून मऊ होतात, अशावेळी काही घरगुती ट्रिक्स वापरून केळी दीर्घकाळ ताजी आणि टवटवीत ठेवू शकता.
केळीच्या देठाचा भाग प्लास्टिक रॅप किंवा फॉइलने घट्ट झाकून ठेवा.
यामुळे केळी पिकण्याचा वेग काहीसा मंदावतो. तसेच, केळी एकमेकांपासून थोडी दूर ठेवा.
केळी उष्ण ठिकाणी ठेवल्यामुळे ती लवकर पिकतात. त्यामुळे गॅसच्या शेजारी किंवा उन्हाच्या खिडकीसमोर ती ठेवणे टाळा. तसेच सफरचंदासारख्या फळांपासून दूर ठेवा.

