खंदकखोर पाकिस्तानची घुसखोरीची खुमखुमी अद्याप कायम असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. पाकिस्तानी लष्कराने आयएसआयच्या मदतीने जम्मू-कश्मीरच्या सीमावर्ती भागात शिरकाव करण्यासाठी पानसर गावात उघडणारा भुयारी खंदक खोदल्याचे स्पष्ट झाले. गेल्या 10 दिवसांत पाकड्यांनी सीमेवरून आरपार जाण्यासाठी खोदलेला हा दुसरा बोगदा आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी जम्मू-कश्मीरमधील हिरानगर सेक्टरमधील पानसर येथे एक बोगदा शोधून काढला. या बोगद्याची लांबी 150 मीटर लांब आणि 30 फूट खोल असून दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानी गुप्तचर विभागाकडून या बोगद्याची निर्मिती करण्यात आली होती असे हिंदुस्थानी गुप्तचर संघटनांचे म्हणणे आहे.

