अभिनेते आणि शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे 18 डिसेंबरला मोठी घोषणा करणार आहेत. त्यांनी नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट टाकून ही माहिती दिली आहे. 'येत्या 18 डिसेंबरला मोठी घोषणा करणार' असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. अमोल कोल्हेंच्या या फेसबुक पोस्टमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
अमोल कोल्हे यांनी पोस्टमध्ये भगवा रंग बॅकग्राऊंडला ठेवला आहे. 'A Big Announcement..On 18 th December!!!'
कोल्हेंनी फेसबुकवरुन पोस्ट करताना, बॅकग्राऊंडचा रंग भगवा निवडला आहे त्यामुळे येत्या 18 डिसेंबरला खासदार अमोल कोल्हे नक्की कोणती घोषणा करणार? याबाबत उत्सुकता आहे.

