Dailyhunt
काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत बारामतीत माघार घेणार नाही, भाजप नेत्यांशी चर्चा नाही

काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत बारामतीत माघार घेणार नाही, भाजप नेत्यांशी चर्चा नाही

सामना 1 week ago

काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेणार नाही. उमेदवारी मागे घेण्याबाबत भाजप नेत्यांशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आकाश मोरे यांची उमेदवारी दिली आहे. पण, आज अचानक मोरे यांनी अजे मागे घेतल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेतली नसल्याचे स्पष्ट केले. उमेदवारी माघारीबाबत भाजपच्या कोणत्याही नेत्याने काँग्रेसशी संपर्प साधलेला अथवा चर्चा केलेली नाही. काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याच्या अफवा पसरवून भाजप अजितदादा गटाची फसवणूक करत असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

अर्जमाघारीचाआजशेवटचादिवस

बारामतीत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये 53 अर्ज वैध ठरले आहेत. यामधील सहा उमेदवारांनी आज माघार घेतली असून अर्ज माघारीचा आज शेवटाचा दिवस असल्याचे माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana