Thursday, 08 Apr, 11.57 am सामना

ठळक
कोरोना लसीसाठी सेक्स वर्कर उतरल्या रस्त्यावर, प्राधान्याने लस देण्याची केली मागणी

कोरोनाने पुन्हा एकदा जगभरात कहर माजवायला सुरुवात केली आहे. अनेक देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाचे लसीकरणही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशातच ब्राझिलमधील सेक्स वर्करने कोरोना लशीसाठी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. लसीच्या प्राधान्य सूचीत त्यांनाही स्थान मिळावं यासाठी त्यांनी हे आंदोलन केले आहे.

कोरोना लस देण्यासाठी अनेक देशात प्राधान्य यादी तयार केली आहे. त्या आधारेच लस देण्यातक येत आहे. जसे की हिंदुस्थानात प्रथम कोरोना योद्धांना व नंतर साठ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात आली. त्या प्रमाणेच ब्राझिलमध्येही प्राधान्य यादी जाहीर केली गेली. मात्र त्यात सेक्स वर्करला प्राधान्य नसल्याने होरिजोंटे शहरातील सेक्स वर्कर्सने आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.

'आम्ही दररोज वेगवगेळ्या लोकांना भेटतो. त्यांच्याशी आमचा खूप जवळचा संबंध येतो. त्यामुळे आम्हाला लशीची खूप जास्त गरज आहे. सरकारने आधीच मेडिकल कर्मचारी, शिक्षक, कोरोना योद्धा, सिनियर सिटिझन यांना या यादीत स्थान दिले आहे. आता यात आम्हालाही सामिल करावे व लवकरात लवकर आम्हाला लस द्यावी', असे या सेक्स वर्कर्सचे म्हणने आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top