Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोथिंबिरीचे भाव घसरले, शेतकऱ्याने उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडल्या

कोथिंबिरीचे भाव घसरले, शेतकऱ्याने उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडल्या

सामना 3 weeks ago

पालेभाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने कोथिंबीर आणि मेथी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. काढणी, जुड्या बांधणी आणि वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने मंचरमधील नागापूर येथील शेतकऱ्यांनी उभ्या कोथिंबिरीच्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडल्या.

कोथिंबिरीची काढणी करण्यासाठी मजुरी, त्यानंतर जुड्या बांधणे, बाजार समितीपर्यंत वाहतूक आणि विक्रीसाठी होणारा अन्य खर्च यामुळे शेतकऱ्याच्या हातात फारसे काही शिल्लक राहत नाही. कोथिंबीर विक्रीतून काढणी आणि वाहतुकीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे कोथिंबिरीच्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडाव्या लागल्या, अशी व्यथा दत्तात्रय वाघ यांनी व्यक्त केली.

किरकोळ बाजारात सध्या कोथिंबिरीची एक जुडी अवघ्या पाच रुपयांना विकली जात आहे. या दरात उत्पादन, काढणी आणि वाहतुकीचा खर्चही भरून निघणे कठीण असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana