Thursday, 14 Jan, 5.00 am सामना

ठळक
कृषी कायद्यांना स्थगिती देऊन लक्ष्मण रेषा ओलांडली, कोर्टाला अचानक एवढी तत्परता आली कोठून?

कृषी कायद्यांना स्थगिती देऊन सर्वोच्च न्यायालयाने लक्ष्मण रेषा ओलांडली आहे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे. सीएए, लव्ह जिहाद, देशद्रोह यासारखे कायद्यांचे विषय न्यायालयापुढे आहेत. मात्र, कृषी कायद्यांना तत्काळ स्थगिती दिली गेली. अचानक एवढी तत्परता न्यायालयाला आली कोठून?, असा महत्वपूर्ण सवालही बापट यांनी केला आहे.

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर दीड महिन्यापासून शेतकऱ्य़ांचे आंदोलन सुरू आहे. हे कायदे रद्द करावे, अशी शेतकऱ्य़ांची मागणी आहे. काल मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांच्या अंमलबजावणीस तात्पुरती स्थगिती दिली. यासंदर्भात घटनातज्ञ उल्हास बापट यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपले परखड मते मांडली आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top