Sunday, 19 Aug, 8.40 am सामना

क्रीडा
कुस्तीपटू बजरंग पुनियाने हिंदुस्थानला मिळवून दिले पहिले सुवर्णपदक

सामना ऑनलाईन। जकार्ता

१८ व्या आशियाई क्रिडा स्पर्धेमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने हिंदुस्थानला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ६५ किलो वजनी गटात पुनियाने जपानच्या दाईची ताकातानी याचा १०-८ च्या फरकाने पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज पहिला दिवस असल्याने देशवासियांच्या नजरा आजच्या खेळावर खिळल्या होत्या. यावेळी पुनियाबरोबरच हिंदु्स्थानच्या नेमबाजपटूंनी कास्य पदकांची कमाई करत देशवासियांच्या आशा उंचावल्या.

हिंदुस्थानच्या रवी कुमार व अपुर्वी चंदेला या जोडीने १० मी एअर रायफल सांघिक प्रकारात कांस्य पदक कमावले आहे. अंतिम फेरीत या जोडीने कोरिया व मंगोलिया यांना टक्कर देत पदकाची कमाई केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पुनियाचे अभिनंदन केले आहे. आशियाई खेळात हिंदुस्थानला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक असल्याने हा विजय विशेष असल्याचे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यानेही पुनियाचे अभिनंदन केले असून तुझ्यावर गर्व असल्याचे म्हटले आहे.

summary…india-won-first-gold-medal-in-asian-game

Dailyhunt
Top