Sunday, 24 Jan, 12.05 pm सामना

ठळक
लग्नासाठी निघालेल्या वरुण धवनच्या कारला अपघात

अभिनेता वरुण धवन याचे आज त्याची लाँग टाईम गर्लफ्रेंड नताशा दलाल सोबत लग्न होणार आहे. मात्र लग्नासाठी निघालेल्या वरुण धवनच्या गाडीला अपघात झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात किरकोळ असून यात कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र वरुणच्या गाडीचे नुकसान झाले आहे.

वरुण धवन आणि त्याची फॅशन डिझायनर मैत्रीण नताशा आज लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. दोघांचेही कुटुंबीय अलिबागला पोहोचले आहेत. शनिवारी वरुण अलिबागला निघाला होता. लग्नाच्या तयारीसाठी वरुण आणि नताशाच्या घरातील मंडळी शुक्रवारीच अलिबागला पोहोचले. पण त्या दिवशी वरुणला जाणं शक्य नसल्याने तो शनिवारी निघाला. अलिबागला निघाला असताना वाटेत त्याचा अपघात झाला.

अलिबाग येथील मॅन्शन हाऊसमध्ये या दोघांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी काही निवडक 50 लोकांना आमंत्रण दिले आहे. कडेकोट बंदोबस्तात हे लग्न पार पडणार आहे. लग्नसोहळ्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येनं सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. लग्नात हजेरी लावणाऱ्या प्रत्येकावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची खास नजर असणार आहे. डेव्हिड धवन हे लग्न खूप खासगी ठेवू इच्छित असल्याने लग्नात काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना त्यांचा मोबाईल फोन वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

या लग्नसोहळ्यात वरुणचे बॉलिवूडमधील मित्र करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर-मलाइका अरोरा, जाह्नवी कपूर-खुशी कपूर, कतरिना कैफ, नीतू कपूर, कियारा अडवाणी, अनिल कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर सहभागी होणार आहेत. वरुणची बेस्ट फ्रेण्ड अभिनेत्री आलिया भट्टही लग्नाला हजेरी लावणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top