Dailyhunt
लपाछपी जीवावर बेतली, पलंगात लपलेल्या दोन वर्षांच्या मुलीचा गुदमरून मृत्यू

लपाछपी जीवावर बेतली, पलंगात लपलेल्या दोन वर्षांच्या मुलीचा गुदमरून मृत्यू

सामना 3 weeks ago

पाछपी खेळताना पलंगात लपलेल्या मुलीचा श्वास गुदरमल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात राणीगंजमधील दुर्गागंज जयरामपूर गावात ही घटना घडली.

या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

शाकीर रेन यांची दोन वर्षांची मुलगी रविवारी दुपारी इतर मुलांसोबत घरी लपाछपी खेळत होती. यावेळी लपण्यासाठी ती खोलीतील बेडच्या बॉक्समध्ये घुसली. बराच वेळ मुलगी कुठेही दिसली नाही म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध केली. अनेक तास शोध घेऊनही मुलगी कुठेच सापडली नाही.

मुलीचा शोध घेत असताना कुटुंबाच्या एका सदस्याने खोलीतील पलंगाचा संशय आल्याने खोलून पाहिला. मुलगी पलंगात बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तात्काळ राणीगंज ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आणि श्वास गुदमरल्यामुळे आधी मुलगी बेशुद्ध झाली आणि नंतर तिचा मृत्यू झाला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana