Dailyhunt
लेकाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच कतरिना आणि विकी कौशल दिसले एकत्र

लेकाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच कतरिना आणि विकी कौशल दिसले एकत्र

सामना 1 week ago

भिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांच्या पहिल्या मुलाला विहानला जन्म दिला. त्यानंतर विकीने अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावली होती.

परंतु कतरिनाने मात्र सार्वजनिक जीवनापासून आणि प्रसिद्धीपासून स्वतःला वेगळे ठेवले होते. नुकतेच मुंबई विमानतळावर हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र दिसल्यावर त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला. दोघे एकत्र दिसल्यावर चाहत्यांनी सोशल मीडियावर या दोघांवर प्रेमाचा वर्षाव केला. परंतु छोटा विहान मात्र त्यांच्यासोबत नव्हता म्हणून तो कुठे आहे? असेही प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात आले.

रविवारी रात्री उशिरा पापाराझींनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये, विकी आणि कतरिना मुंबई विमानतळावर दाखल होताना दिसले. दोघांनीही पापाराझींना आनंदाने पोज दिली. विकीने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम घातली होती. तर दुसरीकडे कतरिनाने काळ्या रंगाचा ओव्हरकोट घातला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अवघ्या काही सेकंदामध्ये व्हायरल झाला हे वृत्त इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिले आहे.

त्यानंतर या दोघांवर कौतुकाचा वर्षाव झाला. याबरोबरीने चाहत्यांच्या प्रश्नांच्या भडीमाराला सुरुवात झाली. अनेकांनी दोघेही खूप सुंदर दिसत असल्याचे प्रतिक्रियांच्या माध्यमातून म्हटले. तर इतर काही चाहत्यांनी विहान कुठे आहे अशी विचारणा देखील केली.

विकी कौशल आणि कतरिना कैफ काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांनी राजस्थानमध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत एका खाजगी विवाह सोहळ्यात लग्न केले. नोव्हेंबर २०२५ मध्ये या जोडप्याला विहान कौशल नावाचा मुलगा झाला. इंस्टाग्रामवर आपल्या मुलाची एक झलक पोस्ट करताना त्यांनी लिहिले, "आमचा प्रकाशकिरण, विहान कौशल. प्रार्थना फळाला आली. आयुष्य सुंदर आहे. एका क्षणात आमचे जग बदलले आहे. "

विकी २०२५ मध्ये ऐतिहासिक ‘छावा’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. यानंतर हा अभिनेता संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे. यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे. कतरिना कैफने मात्र अद्याप कोणताही नवीन प्रोजेक्ट स्विकारल्याचे जाहीर केले नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana