Dailyhunt
लेख - जपयज्ञ - एक अभ्यास

लेख - जपयज्ञ - एक अभ्यास

सामना 1 week ago

>> डॉ. साहेबरावनिगळ

गवानश्रीकृष्णांनीभगवद्गीतेतअनेकप्रकारच्यायज्ञांचेवर्णनकेलेलेआहे. त्यांच्यामतानुसारद्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्यायज्ञानयज्ञवगैरेयज्ञकरणारेअनेकप्रकारचे साधक असतात . काही साधक द्रव्ययज्ञ करणारे , तर काही तपश्चर्यारूप यज्ञ करणारे असतात . दुसरे काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात . कितीतरी साधक आयुष्यासाठी कडक व्रताचे पालन करणारे स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करतात . हे असे यज्ञ मानसिक शारीरिक क्रियांनी उत्पन्न होतात . या अर्थाने विविध यज्ञ हे स्वार्थत्यागमूलक कर्मे होत .

वैदिक धर्म हा 'यज्ञधर्म' म्हणून ओळखला जातो, परंतु पूर्वमीमांसकांनी (उदाहरणार्थ जैमिनी, शबरस्वामी) यज्ञसंस्थेला कर्मकांडाचे रूप दिले होते. वैदिक सूक्तांचा वा वैदिक मंत्रांचा कोणत्या यागात वा यज्ञयागात पुठे उपयोग करायचा यावर 'अथातो धर्म जिज्ञासा' या सूत्राने सुरू होणाऱ्या जैमिनी सूत्रांमध्ये भर दिलेला आहे. त्यांचा धर्म म्हणजे वेदाज्ञांचे पालन होय. त्यांच्या मते कर्म म्हणजे कर्मकांडात्मक क्रिया होत. ज्याला स्वर्गप्राप्ती हवी आहे त्याने यज्ञयाग करावेत. 'स्वर्गकामो यजेत्' असा त्यांचा दंडक होता. आश्चर्य म्हणजे हे पूर्वमीमांसक सृष्टी निर्माता व सृष्टी नियामक अशा परमेश्वरासही मानत नव्हते. 'यज्ञे या हिंसा सा न हिंसा' अशीही त्यांची मान्यता होती. त्यामुळे यज्ञाला मांसाहारी मेजवानीचे स्वरूप आले होते. परिणामी यज्ञांची संख्याही वाढू लागली होती. भगवान गौतम बुद्ध यांनी (ख्रिस्तपूर्व सहावे शतक) अशा यज्ञांना विरोध केला होता. उपनिषदांमध्येही अशा यज्ञांना विरोध सुरू झाला होता. पूर्वमीमांसक हे उपनिषदांना (ज्ञानकांड) महत्त्व देत नव्हते.

'यज् देवपूजासंगतीकरणदानेषु' अशीही पुढील काळात यज्ञाची व्याख्या देणे सुरू झाले. श्रेष्ठांचे पूजन, मैत्रीकरण व गरजूंना वेगवेगळ्या प्रकारचे दान देणे म्हणजे यज्ञ होय. उदाहरणार्थ, भुकेलेल्यांना अन्नदान, अज्ञानी जनांना विचार व ज्ञानदान, भयभीतांना अभयदान अशा प्रकारे यज्ञ संकल्पना ही व्यापक अर्थाने वापरली जाऊ लागली. यासंदर्भात तत्कालीन क्षत्रिय वर्गाकडून ब्रह्मविद्येची (वेदांताची) संकल्पना प्रसृत करण्यात आली. श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, ''मी तुला जो योग (कर्मयोग, निष्काम कर्मयोग) सांगणार आहे तो पूर्वीच्या राजर्षींनी (Philosopher Kings) प्रतिपादिलेला योगच सांगणार आहे. (एवं परंपरा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः। भगवद्गीता.) फार काळ गेल्यामुळे तो लुप्त झालेला आहे. त्याचेच पुनरुज्जीवन मी करीत आहे.

कर्मयोगी व ज्ञानी क्षत्रियांनी धर्म संकल्पना व्यापक केली. कर्माची बैठक ज्ञान असून प्रेरणा ईश्वरभक्तीची आहे. पुढील काळात वर्णव्यवस्थेनुसार व्यवसाय हे जन्माने अर्थात अनुवंशाने ठरविले जाऊ लागले. त्यामुळे स्वतः उच्च वर्णाचे समजणाऱ्या वर्णातील पुढील पिढय़ांनी ज्ञानाकडे व कर्तव्यास आवश्यक असलेल्या गुणसंवर्धनाकडे, गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे वेदांचा, वेदांताचा अभ्यास करून त्यातील सद्विचार समाजाला देण्याचे कार्य थंडावले. जन्माने श्रेष्ठत्व, पूज्यत्व मिळत असेल तर त्यासाठी कष्ट कोण उपसणार? मेहनत कोण करणार? सद्गुरूंच्या मुलासही अनुवंशाने लोक गुरूचा मान देऊ लागले. त्यामुळे एक-दोन पिढय़ांमध्ये बहुसंख्य श्रेष्ठ वर्णातील मुले कष्टापासून व कर्तव्यपूर्तीपासून दूर जाऊ लागली. परिणामतः योग्यतेशिवाय गुरुपद मिळू लागले. योग्यतेशिवाय राजगाद्या मिळू लागल्या. त्यामुळे समाजाचे अधःपतन न झाले तरच आश्चर्य होते. यज्ञसंस्था म्हणजे एक संस्कृती विस्तारक संघच होता. म्हणूनच त्या काळी हे यज्ञ किंवा सत्कर्म जंगलात होत असत. जिथे सद्विचार, जीवनमूल्ये पोहोचली नाहीत त्या ठिकाणी सद्विचार प्रसाराचे हे कार्य होते. त्या अज्ञ जनांमध्ये अस्मिता, कृतज्ञता, नम्रता, तेजस्विता, कर्तव्यनिष्ठा वगैरे मानवी मूल्ये रुजविण्याचे ते कार्य होते. राक्षसी वृत्तीच्या लोकांना ते पसंत नव्हते. म्हणूनच ते अशा यज्ञसंस्थांना विरोध करीत असत.

भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत (4/28) अनेक प्रकारच्या यज्ञांचे वर्णन केलेले आहे. त्यांच्या मतानुसार द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याय ज्ञानयज्ञ वगैरे प्रकारचे यज्ञ करणारे अनेक प्रकारचे साधक असतात.

'द्रव्ययज्ञःतपोयज्ञःयोगयज्ञास्तथापरे।

स्वाध्यायज्ञानयज्ञश्चयतयःसंशितव्रताः।'

(भगवद्गीता– 4/28)

काही साधक द्रव्ययज्ञ करणारे, तर काही तपश्चर्यारूप यज्ञ करणारे असतात. दुसरे काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात. कितीतरी साधक आयुष्यासाठी कडक व्रताचे पालन करणारे स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करतात. हे व असे यज्ञ हे मानसिक व शारीरिक क्रियांनी उत्पन्न होतात. या अर्थाने विविध यज्ञ हे स्वार्थत्यागमूलक कर्मे होत. ते केल्याने साधकांची सर्व पापे नष्ट होतात व ते 'सर्व भूतेहितरत' (भगवद्गीता 5/25) असतात. भगवद्गीतेच्या भाषेत असे साधक हे सर्व प्राणिमात्रांचे मित्र असतात (Universal friendship).

भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात दैवी विभूतींचे वर्णन आलेले आहे. या अध्यायाच्या 25 व्या श्लोकात योगेश्वर श्रीकृष्ण स्पष्ट करतात यज्ञानां जपयज्ञोस्मि (श्रीमद भगवद्गीता 10/25) सर्व यज्ञांमध्ये मी जपयज्ञ आहे, असे स्पष्टपणे सांगतात. सर्वांसाठी त्यांनी जपयज्ञाचा विशेष पुरस्कार केलेला आहे. याच विधानाच्या आधारे सर्वांना सुलभ अशी नामस्मरणाची साधना ईश्वरभक्तांनी किंवा ज्ञानी संतांनी पुढील काळात सांगितलेली आहे. या साधनेचा विचार करणे आवश्यक आहे.

विश्वाच्या मुळाशी अगाध अशी चैतन्य शक्ती आहे. तिला मानवाने आपापल्या भाषेत कोणते तरी नाव दिलेले असते. जगात जेवढय़ा भाषा आहेत तेवढी या चित्शक्तीची नावे असणे अगदी नैसर्गिक आहे. या चित्शक्तीला आपण परमात्मा, परमेश्वर अशी अनेक नावे देतो. मानवाला या परमेश्वराचे ज्ञान होऊ शकते का? पंचज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी यांनी मिळणारे ज्ञान फार मर्यादित असते. ज्याप्रमाणे आपण जगातील अनेक वस्तू व प्राणी, मानव यांना बघतो तसे ज्ञान परमेशाचे होणे शक्य नाही. बुद्धीने व धर्मग्रंथातून मिळणारे ज्ञान हे आपल्यासाठी परोक्ष (Indirect) ज्ञान असते. मग परमेश्वर हा अज्ञेयच राहणार का? जगात जे ईश्वर साक्षात्कारी गूढवादी (Mystics) झाले, त्यांच्या मते ईश्वराचे साक्षात ज्ञान (Direct) वा अनुभूती होऊ शकते. त्यासाठी अनेक साधना मार्ग ऋषीमुनी व संतमहात्म्यांनी शोधलेले आहेत. असे महात्मे सर्व देशांमध्ये पूर्वीपासून आढळून येतात आणि ते एकच भाषा बोलतात. Mystics speak the same tongue or language.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana