Dailyhunt
लिबियाच्या समुद्रात मोठी दुर्घटना; स्थलांतरितांच्या बोटीला अपघात, 17 जणांचा मृत्यू तर 9 बेपत्ता

लिबियाच्या समुद्रात मोठी दुर्घटना; स्थलांतरितांच्या बोटीला अपघात, 17 जणांचा मृत्यू तर 9 बेपत्ता

सामना 1 week ago

लिबियाच्या समुद्रात स्थलांतरितांच्या बोटीला अपघात झाला असून यात 17 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण बेपत्ता झाले आहेत. इंजिन निकामी झाल्यामुळे तब्बल आठ दिवस ही बोट समुद्रात भरकटली. लिबियाच्या रेड क्रिसेंट आणि सुरक्षा दलांनी बुधवारी अपघाताबाबत माहिती दिली.

लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, लिबियन नॅशनल आर्मीच्या नौदल आणि तटरक्षक दलाच्या मदतीने पूर्व लिबियातील तोब्रुक शहराच्या किनाऱ्याजवळ बचावकार्य राववण्यात आले. या शोध मोहिमेदरम्यान सात जणांना वाचवण्यात यश आले, तर 9 जण अद्याप बेपत्ता आहेत, असे रेड क्रेसेंटने एका निवेदनात म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana