Friday, 04 Oct, 6.40 am सामना

मुंबई
Live - आकड्यांपेक्षा महाराष्ट्राचे हित महत्त्वाचे - उद्धव ठाकरे

शिवसेना-भाजपसह मित्रपक्षांच्या महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू होणार आहे. या परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी भूमिका मांडतील

 • भूमिका सतत बदलत असते. काही विधानसभेत काम करतील, काही विधानसभेबाहेर काम करतील - मुख्यमंत्री
 • ज्यांना आम्ही सोबत घेऊ शकत होतो, योग्य होतो त्यांना आम्ही घेतले - मुख्यमंत्री
 • महाराष्ट्र जर चांगला घडवायचा असेल तर तुझं माझं करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विचार करायला हवा
 • लहान भाऊ मोठा भाऊ हे महत्त्वाचं नाही दोन भाऊ एकत्रं जाणं महत्त्वाचं आहे - उद्धव ठाकरे
 • मुख्यमंत्री आम्ही आपआपसात बसून ठरवू - उद्धव ठाकरे
 • आकड्यांवर सर्व काही अवलंबून नसतं
 • शिवसेना -124 जागा, भाजप - 150, मित्रपक्ष - 2
 • महाराष्ट्राच्या मनातली महायुती आज मैदानात उतरलीय - मुख्यमंत्री
 • शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करायचे असेल तर निसर्गावर अवलंबून राहता येणार नाही.
 • गेली पाच वर्ष जलसंधरणाचं चांगलं काम आमच्या सरकारने केलंय. पुढच्या पाच वर्षात दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा आहे.
 • महाराष्ट्रात विकासाची सुरुवात केली आहे.
 • जर समजावल्यानंतरही बंडखोरी केली तर त्यांना त्यांच्या जागा दाखवून देऊ
 • कुठेही बंडखोरी राहणार नाहीत.
 • अनेक ठिकाणी बंडखोर झालीय. काही ठिकाणी दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांसमोर आहेत. त्या नेत्यांना कार्यकर्त्यांना समजावणार आहोत.
 • मुंबईत आदित्य ठाकरे निवडून येतील. मी त्यांचे स्वागत करतो - मुख्यमंत्री
 • महायुती संपूर्ण महाराष्ट्रात निवडून येईल
 • एकत्र राहायचं असेल तर तडजोड करावी लागते ती आम्ही सर्वांनी केलीय
 • लोकसभेत महायुतीला लोकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. त्यात एनडीएला मोठं यश मिळालं. त्या यशात महायुतीचा मोठा वाटा होता - मुख्यमंंत्री
 • पण हिंदुत्त्वाचा धागा शिवसेना व भाजपला जोडतो
 • लोकसभेच्या वेळी महायुतीची घोषणा केलेली तेव्हाच माहित होतं की काही मतभेद असतीलच
 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचले

 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचले

 • मनोहर जोशी, आशिष शेलार, अनिल देसाई, राज पुरोहित उपस्थित
 • थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात होणार

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top