Sunday, 25 Aug, 9.40 am सामना

देश
LIVE- अरुण जेटली यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात आणले, अंत्यदर्शनाला सुरुवात

 • केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन आणि पीयूष गोयल, झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी जेटली यांचे अंत्यदर्शन घेतले.
 • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अरुण जेटली यांचे अंत्यदर्शन घेतले
 • जेटली यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी
 • जेटली यांचं निधन हा व्यक्तिचा नव्हे तर एका संस्था किंबहुना एका युगाचा अंत आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात ते माझ्यासाठी गुरूसमान होते. त्यांचं जाणं हे माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान आहे - अनुराग ठाकूर, भाजप खासदार
 • जेटली यांच्या निधनामुळे भाजप तसेच देशाचं खूप मोठं नुकसान- हेमा मालिनी, खासदार
 • मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाचे नेते म्हणून त्यांनी आपल्या भूमिका उत्तम निभावल्या. ते देशातले प्रख्यात विधिज्ञ होते. हिंदी, इंग्रजी भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. राज्यसभेतील त्यांची भाषण हा एक अभ्यासाचा विषय ठरावा, इतकी महत्त्वाची आहेत. त्यांच्या जाण्याने खूप नुकसान झालं आहे. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबाने खंबीर राहावं म्हणून परमेश्वर त्यांना धैर्य देवो आणि जेटली यांच्या आत्म्याला शांती मिळो ही प्रार्थना- नितिन गडकरी, केंद्रीय दळणवळण मंत्री
 • शालीन व्यक्तिमत्त्वाचे धनी, उत्तम वक्ते या रुपांमध्ये जेटली कायम आठवणीत राहतील- मोती लाल वोहरा, ज्येष्ठ नेते भाजप
 • आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी भाजप मुख्यालयात गर्दी
 • अमित शहा यांनी जेटली कुटुंबीयांचे सांत्वन केले.
 • गृहमंत्री अमित शहा यांनी जेटली यांचे अंत्यदर्शन घेतले
 • अरुण जेटली यांच्या पत्नी संगीता आणि कुटुंबीयांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
 • जेटली यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी नेते, कार्यकर्ते आणि चाहत्यांची भाजप कार्यालयात गर्दी
 • गृहमंत्री अमित शहा, भाजपचे नेते भाजप मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी दाखल
 • आज दुपारी 2.30 वाजता निगम बोध घाट येथे अरुण जेटली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार
 • जेटली यांचे पार्थिव दिल्ली येथील भाजप मुख्यालयात आणले
 • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जेटली यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
 • दिल्ली येथील जेटली यांच्या निवासस्थानी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मान्यवर दाखल
 • जेटली मला मोठ्या भावासारखे होते, त्यांच्या निधनाने मोठी हानी झाल्याने केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.
 • राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेटलींच्या निधनाबाबत व्यक्त केले दुःख
 • उत्तम खासदार आणि चांगला प्रशासक आपण गमावला आहे, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केला शोक
 • अरुण जेटली यांचे पार्थिव त्यांच्या कैलाश कॉलनी येथील निवासस्थानी आणण्यात आले आहे. रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत तेथे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर भाजप मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
 • समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनीही अरुण जेटली यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या निधनाने राजकारणाची मोठी हानी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 • काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त करत ते कायम स्मरणात राहतील अशा शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.
 • राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंध ठेवणारा खांब कोसळला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला शोक
 • रविवारी दुपारी 2 वाजता जेटली यांच्यावर होणार अंत्यसंस्कार
 • तुमची खूप आठवण येईल अरुणजी…- शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या शोकभावना
 • रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी जेटली हे माझ्या मोठ्या भावासमान होते, असं म्हणत त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
 • परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी अरुण जेटलींना वाहिली श्रद्धांजली
 • जेटली यांचे जाणे हे देशासाठी व माझ्यासाठी कधीच न भरून निघणारे नुकसान आहे - उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू
 • संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांनी जेटली यांच्या निधनावर व्यक्त केला शोक
 • अरुण जेटलींच्या निधनामुळे शिवसेनेची वैयक्तिक हानी! उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला शोक

 • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
 • जेटली यांच्या जाण्याने शिवसेनेची वैयक्तिक हानी- उद्धव ठाकरे
 • जेटली यांचे व्यक्तिमत्त्व असामान्य होते. सार्वजनिक जीवनात इतका प्रदीर्घ काळ राहूनही त्यांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व जपले. ते निष्णात वकील व धुरंधर नेते होते. संकटमोचक म्हणून जेटली यांनी मोदी सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. शिवसेना-भाजपमध्ये नाते टिकावे, असे मानणाऱ्या पैकी जेटली होते. जेटली यांनी राजकारणात राहूनही नाती व माणसे जपली. राष्ट्रीय राजकारणातील जेटली यांचे जाणे हे राष्ट्रीय राजकारणातून साहसी व्यक्तीचे जाणे आहे .आम्ही स्वतः अरुण जेटली यांचे चाहते होतो. त्यांच्या जाण्याने ठाकरे परिवार व शिवसेनेची वैयक्तिक हानी झाली आहे.- उद्धव ठाकरे
 • भाजप आणि अरुण जेटली यांचं एक अतूट नातं होतं. एक प्रखर विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी आणीबाणीच्या काळात लोकशाही रक्षणात अजोड योगदान दिलं होतं. आमच्या पक्षातील ते एक लोकप्रिय नेते होते. - पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • दिलखुलास व्यक्तिमत्वाच्या जेटली यांना भेटणं आणि त्यांच्यासोबत विचारांची देवाण घेवाण करणं हा सर्वांसाठीच एक आल्हाददायक अनुभव होता. त्यांच्या जाण्याने राजकारणात आणि भारतीय जनता पक्षात जी मोठी पोकळी निर्माण झाली आहे, तिची भरपाई होणं इतक्यात तरी दुरापास्त आहे.- अमित शहा
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुण जेटली यांच्या पत्नी आणि मुलाशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांचं सांत्वन केलं. जेटली यांच्या पत्नी आणि मुलगा या दोघांनीही त्यांना दौरा रद्द न करण्याची विनंती केली आहे.
 • ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
 • केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त केला आहे.
 • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जेटली यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.
 • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि बसपाच्या प्रमुख मायावती यांनीही रुग्णालयात धाव घेत जेटली यांची विचारपूस केली.
 • त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जेटली यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.
 • जेटली यांना 9 ऑगस्टला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 • दिल्लीतील एम्स रुग्णालयाने एका मेडिकल बुलेटिनद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
 • अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
 • पण त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.
 • काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 • गेल्या काही महिन्यांपासून ते सॉफ्ट टिशू सरकोमा या फुफ्फुसाशी संबंधित कर्करोगाने ग्रस्त होते.
 • शनिवारी दुपारी 12 वाजून 07 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
 • माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झालं आहे.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top