Wednesday, 04 Sep, 10.40 am सामना

मुंबई
Live : मध्य रेल्वेची मुंबईकडे येणारी लोकल वाहतूक बंद पडली

 • सप्टेंबर महिन्यात जेवढा पाऊस पडतो, तो पाऊस अवघ्या 30 तासात झाला आहे.
 • मिठी नदीची पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली
 • सायन आणि माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने जलद मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही दिशेची वाहतूक बंद झाली
 • कल्याण स्थानकात वाहतूक बंद झाल्याची उद्घोषणा
 • कल्याणहून मुंबईला जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक बंद पडली
 • मध्य रेल्वेची मुंबईकडे येणारी लोकल वाहतूक बंद पडली
 • पुढचे दोन दिवस मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
 • मुंबईसाठी पूर्वी ऑरेंज अलर्ट जारी केला होता, हवामान खात्याने आता मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे
 • नागोठण्याला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे
 • पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर चौक येथील वावार्ले गावा जवळ रेल्वे रुळावर पाणी साठल्याने वाहतूक ठप्प
 • कोकणातून मुंबईकडे येणारा मार्ग सुरू असून, दरड हटवण्याचे काम सुरू झाले
 • कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक ठप्प
 • रोहा आणि नागोठण्यादरम्यान रुळांवर दरड कोसळली
 • पनवेल, नागोठणे येथे अनेकांच्या घरात पाणी शिरले, भक्तांच्या घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला पाण्याचा वेढा
 • अलिबाग तालुक्यातील रामराज गावात पाणी घुसले
 • पेण तालुक्यातील खरोशी गावात बाळगंगा नदीला पूर आला
 • महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस, दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली

रायगड,रत्नागिरीला पावसाने झोडपून काढले

 • ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने पुण्याहून कोलाडकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
 • मुंबई, ठाणे आणि कोकणात शाळांना सुट्टी जाहीर केल्याची माहिती शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे दिली

नालासोपारा स्थानकाजवळ ट्रॅकवर पाणी साचले आहे
पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक 20 मिनिटे उशिराने सुरू आहे
हा फोटो नालासोपारा स्थानकाजवळचा आहे
ठाणे स्थानकातील रुळ पाण्याखाली गेले आहेत
मध्य रेल्वेची वाहतूक किमान 40 मिनिटे उशिराने सुरू आहे

 • रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने वाणगाव-डहाणू आणि बोईसर-चिल्हार दरम्यानची रस्ते वाहतूक बंद

 • कुंडलिका, अंबा,सावित्री आणि पाताळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे
 • दादर आणि माटुंगा स्थानकादरम्यान रेल्वेरुळ पाण्याखाली गेले
 • मुंबई,ठाण्यातील अनेक खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना लवकर घरी सोडले
 • ठाणे रेल्वे स्थानकात रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली
 • हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर
 • मध्य रेल्वेच्या गाड्या तब्बल 40 मिनिटे उशिरा असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे
 • मुंबईच्या सायन भागात पाणी साचले
 • मुंबईत गेल्या 21 तासांत 103 मिमी पावसाची नोंद
 • मुंबई ठाण्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडत असून रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top