कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने राज्य सरकारने सध्या असलेले लॉकडाऊनचे निर्बंध 31 डिसेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेश आज राज्यातील मुख्य सचिवांकडून काढण्यात आला असून 30 सप्टेंबर, 14 ऑक्टोबर आणि 16 नोव्हेंबर रोजी देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच यापुढेही कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्या गाइडलाइन्सला अनुसरून वेळोवेळी त्यात बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत ज्या सवलती देण्यात आल्या आहेत त्या यापुढेही कायम ठेवतानाच कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

