Dailyhunt
लोकलची गाईला धडक; 'परे'ची वाहतूक विस्कळीत, वाणगाव- डहाणूदरम्यान प्रवाशांचे हाल

लोकलची गाईला धडक; 'परे'ची वाहतूक विस्कळीत, वाणगाव- डहाणूदरम्यान प्रवाशांचे हाल

सामना 4 days ago

हाणूकडे जाणाऱ्या लोकलने गाईला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या धडकेत लोकलचा पुढील लोखंडी गार्ड तुटला असून अपघातामुळे वाणगाव-डहाणूदरम्यानच्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

दुपारी चारच्या सुमारास अचानक एक गाय रेल्वे रुळावर आडवी आली. वेगात येणाऱ्या लोकल ट्रेनला वेळेत ब्रेक लावता न आल्याने गाईला धडक बसली. या धडकेत लोकलच्या पुढील भागातील लोखंडी गार्ड तुटला. या अपघातात सुदैवाने प्रवासी बचावले.

अपघातानंतर संबंधित लोकल काही काळ ट्रॅकवरच थांबून राहिल्याने डहाणूकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील उपनगरीय सेवा सुमारे १५ ते ३० मिनिटे उशिराने धावू लागली. याच मार्गावरून जाणारी बांद्रा-जोधपूर ही लांबपल्ल्याची एक्स्प्रेसही सुमारे २० मिनिटे अडकून पडली होती.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. नुकसानग्रस्त गार्ड दुरुस्त करून रुळावरील अडथळा दूर करण्यात आला. त्यानंतर डाऊन लाईनवरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. दरम्यान या घटनेमुळे गर्दीच्या वेळेत प्रवाशांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागला. रेल्वे रुळांवर जनावरे येण्याच्या वारंवार घटनांमुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला असून लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana