Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लोकशाहीत हिंसेला स्थान नाही; वॉशिंग्टनमधील गोळीबाराच्या घटनेचा पंतप्रधान मोदींकडून तीव्र शब्दात निषेध

लोकशाहीत हिंसेला स्थान नाही; वॉशिंग्टनमधील गोळीबाराच्या घटनेचा पंतप्रधान मोदींकडून तीव्र शब्दात निषेध

सामना 2 months ago

मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. व्हाइट हाउस कॉरेस्पोंडेंट्स डिनर कार्यक्रमात झालेल्या गोळीबारातून डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प, उपाध्यक्ष जेडी व्हान्स थोडक्यात बचावले आहेत.

याबद्दल मोदींनी समाधानही व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी एक्सवरून एक पोस्ट केली. वॉशिंग्टन डीसी येथील एका हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स सुरक्षित आणि सुरक्षित असल्याचे समजल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करतो, असे मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. तसेच लोकशाहीमध्ये हिंसेला अजिबात स्थान नाही. अशा कृत्यांचा स्पष्ट शब्दांत निषेध केलाच पाहिजे, असेही ते म्हणाले.

नेमकी घटना काय?

शनिवारी रात्री वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलच्या बॉलरूममध्ये जगप्रसिद्ध व्हाइट हाउस कॉरेस्पोंडेंट्स डिनर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांचे सहकारी, हॉलीवूड कलाकार, पत्रकार असे जवळपास 2600 हून अधिक लोक उपस्थित होते. या कार्यक्रमस्थळी एका सशस्त्र व्यक्तीने गोळीबार सुरू केला. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर बॉलरूममध्ये एकच खळबळ उडाली. सिक्रेट सर्व्हिसच्या एजंटने तत्काळ परिसरावर ताबा मिळवत आधी ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया, उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांना व्यासपीठावरून दूर नेले. तसेच हल्लेखोरालाही ताब्यात घेतले.

Donald Trump Shooting – डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर पार्टीवेळी गोळीबार; हल्लेखोराचा फोटो व्हायरल, इराण युद्धाशी संबंध?

इतिहासाची पुनरावृत्ती

ज्या वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये ही घटना घडली, त्याच ठिकाणी 1981 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनल्ड रेगन यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाला होता. विशेष म्हणजे, 2024 च्या निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. त्यावेळी गोळी त्यांच्या डोक्याजवळून गेली होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana