Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मध्य रेल्वेच्या खोळंब्यावर प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक

मध्य रेल्वेच्या खोळंब्यावर प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल फेऱयांना सकाळी आणि सायंकाळच्या पीक अवर्सला नेहमीच विलंब होत आहे. शुक्रवारी सकाळी अनेक लोकल ठिकठिकाणी 15 ते 20 मिनिटे एकामागून एक उभ्या राहत होत्या. त्यात बराच वेळ रखडपट्टी झाल्याने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला.

संतप्त प्रवाशांनी दादर रेल्वे स्थानकाच्या व्यवस्थापकांचे कार्यालय गाठले आणि लोकलच्या विस्कळीत वेळापत्रकावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

मध्य रेल्वेच्या लोकल फेऱयांचे वेळापत्रक वारंवार कोलमडत आहे. त्यामुळे उशिराने धावणाऱया गाडय़ांना प्रचंड गर्दी होत आहे. दररोज हा त्रास सहन करावा लागत असल्याने शुक्रवारी प्रवाशांनी दादर रेल्वे स्थानकाच्या व्यवस्थापकांचे कार्यालय गाठले. लोकल फेऱयांच्या वेळापत्रकात तातडीने सुधारणा करण्यात यावी, रेल्वे प्रशासनाने याबाबत ठोस उपाययोजना आखाव्यात, अशा मागण्या प्रवाशांकडून करण्यात आल्या.

  • विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि हार्बर लाइनवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गांवर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तसेच हार्बरवर कुर्ला ते वाशीदरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. ब्लॉकमुळे लोकल गाडय़ा उशिराने धावणार आहेत.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana