Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मध्यान्ह भोजन देणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापकांना परवाना काढण्याचा आदेश रद्द करा,  शिक्षक सेनेचे शिक्षण निरीक्षक कार्यालयावर आंदोलन

मध्यान्ह भोजन देणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापकांना परवाना काढण्याचा आदेश रद्द करा, शिक्षक सेनेचे शिक्षण निरीक्षक कार्यालयावर आंदोलन

सामना 1 week ago

ध्यान्ह भोजन देणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापकांना परवाना काढण्याचा आदेश रद्द करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, मुंबई यांच्याकडून करण्यात आली. या मागणीसाठी शिक्षक सेनेने आज बृहन्मुंबई शिक्षण निरीक्षक कार्यालय, पश्चिम विभाग (जोगेश्वरी) येथे आंदोलन केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मुंबई विभागातील मुंबई पश्चिम, मुंबई उत्तर व मुंबई दक्षिण महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, रात्र शाळा, सेंट झेवियर्स ग्रुप, अतिरिक्त शिक्षक ग्रुप आदींनी सहकार्य केले. या वेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे, सरचिटणीस प्रकाश शेळके, उपाध्यक्ष सलीम शेख, प्रादेशिक सचिव मुकेश शिरसाट, मुंबई विभाग अध्यक्ष अजित चव्हाण, महिला आघाडीच्या अध्यक्षा मानसी चाळके, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष कैलास गुंजाळ, मुंबई विभाग सरचिटणीस संतोष शिंदे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, मीनल सरकाळे, सुधीर देसाई, आशिष वशी, नारायण राखुंडे आदी पदाधिकाऱ्यांसह मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य समन्वयक नितीन चौधरी यांनी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana