Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महामार्ग ओलांडताना भरधाव कारची धडक; आई ठार, मुलगा गंभीर

महामार्ग ओलांडताना भरधाव कारची धडक; आई ठार, मुलगा गंभीर

सामना 3 weeks ago

मुंबई-अहमदाबाद महामार्ग ओलांडताना भरधाव कारची धडक बसून आईचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना हालोली गावाजवळ आज सकाळी घडली. प्रतीक्षा पाडोसा असे दुर्दैवी मातेचे नाव आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की आई व मुलाला धडक दिल्यानंतर कार उलटून त्यातही तिघे प्रवासी जखमी झाले.

हालोली गावाज-वळच्या पाडोस पाडा परिसरात सकाळी साडेआठ वाजता भीषण अपघात झाला. मायलेक गुजरात वाहिनीवरील रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की यात प्रतीक्षा पाडोसा यांचा जागीच मृत्यू झाला, तर तुषारवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर कार महामार्गालगत उलटली. कारमधील चालकासह तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

चालकाला अटक

मनोर पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, पाडोस पाडा परिसरात वारंवार अपघात होत असल्याने या ठिकाणी उड्डाणपूल किंवा पादचारी पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी यापूर्वी अनेकदा केली आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी मनोर पोलिसांनी कारचालकाला अटक केली. अपघातांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana