Sunday, 01 Sep, 12.40 pm सामना

देश
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी यांची नियुक्ती

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. विद्यमान राज्यपाल सी विद्यासागर राव यांचा कार्यकाल समाप्त झाल्यानंतर कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच कलराज मिश्रा यांना राजस्थानच्या राज्यापालपदी नियुक्त करण्यात आले आहेत. बंडारू दत्तात्रय यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यापलपदी तर आरीफ मोहम्मद खान यांची केरळच्या राज्यपालपदी आणि तमिलसाई सौंदराजन यांनी तेलंगाणाच्या राज्यपालदी नियुक्ती करण्यात आली होती.

महाराष्ट्राचे नवे राज्यपल भगत कोश्यारी सिंह हे 2001-2002 या काळात झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी होते. 2002 ते 2007 दरम्यान ते उत्तराखंड विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते होते. तसेच 2008 ते 2014 दरम्यान झारखंडमधूनच ते राज्यसभेचे खासदार होते. 1977 साली आणीबाणी दरम्यान त्यांनी कारावासही भोगला होता. आता राष्ट्रपतींकडून त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top