Sunday, 25 Aug, 1.54 am सामना

ठळक बातम्या
महिला अंतराळवीराने अवकाशात केला सायबर गुन्हा, तपास सुरू

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या एका महिला अंतराळवीराने अवकाश मोहिमेवर असताना गुन्हा केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सध्या नासा तपास करत आहे. अॅने मॅकक्लेन असे त्या महिला अंतराळवीराचे नाव असून ती सहा महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर असताना तिने विभक्त झालेल्या तिच्या लेस्बियन साथिदाराचे बँक अकाऊंट तपासल्याचे समजते.

अॅनेची लेस्बियन साथिदार समर वोर्डनने काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनकडे अॅने विरोधात तक्रार दाखल केली आहे. समरने दिलेल्या तक्रारीनुसार अॅनेने तिच्या परवानगीशिवाय तिचे बँक अकाऊंट तपासल्याचे सांगितले आहे. जेव्हा अॅने सहा महिन्यांसाठी अंतराळात गेलेली असताना हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले आहे.य

नासाच्या फक्त महिलांसाठीच्या पहिल्या स्पेसवॉकसाठी अॅने मॅकलेनची निवड झाली होती. त्यानंतर ती सहा महिन्यांसाठी अवकाश मोहिमेवर गेली होती. मात्र पृथ्वीवरील तिची तिच्या लेस्बियन साथिरदारासोबतची भांडणं अवकाशात देखील सुरूच होती असे बोलले जाते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top