Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
माजी सरपंचाचे ८ सप्टेंबरपासून पंचायतीसमोर ठिय्या आंदोलन, मांडा-वावेघर पंचायतीत रात्री भाजप सदस्याची घुसखोरी

माजी सरपंचाचे ८ सप्टेंबरपासून पंचायतीसमोर ठिय्या आंदोलन, मांडा-वावेघर पंचायतीत रात्री भाजप सदस्याची घुसखोरी

सामना 5 days ago

मांडा-वावेघर येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात भाजपचे सदस्य ज्ञानेश्वर दळवी व अशोक शिलोत्री यांनी रात्री उशिरा घुसखोरी केल्याच्या प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाची चौकशी करावी यासाठी माजी सरपंच संजय भोईर हे ८ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत.

उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांनी यासंदर्भात निवेदनदेखील दिले आहे. ग्रामपंचायतीचे कार्यालय संध्याकाळी साडेपाचनंतर बंद होते. मात्र २५ ऑगस्ट रोजी वावेघर रात्री १०.२० ते १०.३० या काळात मांडा-वावेघर भाजपचे ग्रामपंचायतीचे कार्यालय उघडून भाजपच्या शिलोत्री सदस्यांनी गुपचूप प्रवेश केला. विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या विकासनिधीबाबतचा प्रस्ताव तयार करण्यासाठी आपण कार्यालयात गेलो होतो, अशी कबुली शिलात्री यांनी सोशल मीडियावर दिली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख ओमकार पाटील यांनीदेखील झेडपीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली होती. आता मांडा-वावेघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय भोईर यांनी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

शिवसेनेचा पाठिंबा
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घुसखोरी करणे ही अतिशय गंभीर बाब आहे. यासंदर्भात माजी सरपंच संजय भोईर यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून त्यांच्या धरणे आंदोलनास शिवसेनेचा पाठिंबा असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाप्रमुख ओमकार पाटील यांनी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana