Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
माकडाने रोखला विमानाचा रस्ता, लखनऊ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली

माकडाने रोखला विमानाचा रस्ता, लखनऊ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली

सामना 1 month ago

खनऊ विमानतळावर गुरुवारी सकाळी मोठी दुर्घटना टळली. इंडिगोचे विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना अचानक धावपट्टीवर माकड आले. वैमानिकाने प्रसंगावधान राखत तात्काळ इमर्जन्सी ब्रेक लावल्याने पुढील अनर्थ टळला.

मात्र यामुळे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. विमानाची तपासणी केल्यानंतर तासाभराने विमानाने उड्डाण केले.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिगोचे विमान 6E6521 हे गुरुवारी सकाळी 8.55 वाजता लखनऊच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रायपूरसाठी उड्डाण करणार होते. एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून (ATC) परवानगी मिळाल्यानंतर विमानाने धावपट्टीवर वेग घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, अवघ्या 200 मीटर अंतरावर असताना वैमानिकाला धावपट्टीवर एक माकड बसलेले दिसले. वैमानिकाने तात्काळ प्रसंगावधान राखत इमर्जन्सी ब्रेक लावून विमान थांबवले. या विमानात 170 प्रवासी आणि कर्मचारी होते. सर्व जण सुखरुप आहेत.

या घटनेमुळे विमानतळावरील इतर विमानांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. एअर इंडिया एक्सप्रेसचे एक विमान लँडिंगच्या तयारीत असतानाच धावपट्टीवर माकड असल्याने त्याला गो अराऊंड करण्यास सांगण्यात आले. धावपट्टीवरून माकडाला हटवून विमानाची संपूर्ण तांत्रिक तपासणी केल्यानंतर सकाळी 10 वाजून 4 मिनिटांनी विमानाने रायपूरसाठी सुरक्षित उड्डाण केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana