Dailyhunt
मानवी साखळी करून वीज प्रकल्पांचे संरक्षण करा; ट्रम्प यांनी दिलेली 'डेडलाईन' संपल्यानंतर इराणचे देशवासियांना आवाहन

मानवी साखळी करून वीज प्रकल्पांचे संरक्षण करा; ट्रम्प यांनी दिलेली 'डेडलाईन' संपल्यानंतर इराणचे देशवासियांना आवाहन

सामना 1 week ago

राण, अमेरिका-इस्रायलमध्ये सुरू असलेले युद्ध निर्णायक वळणावर पोहोचले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी आणि नवीन करारावर स्वाक्षरी करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंतची (हिंदुस्थानात पहाटे साडे पाच) अंतिम मुदत दिली होती.

तसे न झाल्यास इराणचे सर्व वीज प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली होती. ट्रम्प यांनी दिलेली मुदत आता संपली असून अमेरिका काय पावलं उचलणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्यांचा धोका ओळखून इराणने मोठी चाल खेळली असून नागरिकांना मानवी साखळी करून वीज प्रकल्पांचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे.

जर इराणने दिलेल्या वेळेत करार केला नाही, तर एका रात्रीत संपूर्ण देश उद्ध्वस्त केला जाऊ शकतो. इराणमधील सर्व वीज प्रकल्प आणि पूल आगीच्या भक्ष्यस्थानी पडतील आणि ते पुन्हा कधीही वापरता येणार नाहीत, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. तसेच इराणला पाषाण युगा पाठवू, असेही ते म्हणाले होते. ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या एका मंत्र्याने जालीम उपाय सांगितला. इराणचे क्रीडा उपमंत्री अलीरेझा रहिमी यांनी देशातील कलाकार आणि खेळाडूंना वीज प्रकल्पांभोवती मानवी साखळी तयार करण्याचे आवाहन केले आहे.

सार्वजनिक पायाभूत सुविधांवर हल्ला करणे हा युद्धगुन्हा आहे, हे जगाला दाखवून देण्यासाठी आम्ही एकमेकांचे हात धरून उभे राहू, असे रहिमी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या दरम्यान, इराणने युद्ध कायमचे थांबवण्यासाठी अमेरिकेपुढे 10 अटीही ठेवल्या आहेत.

Iran US Israel War – अमेरिकेचा युद्धविरामाचा प्रस्ताव इराणने फेटाळला; युद्ध कायमचे थांबवण्यासाठी ठेवल्या 10 अटी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana