Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मनू भाकर-स्वप्नील कुसाळे वर्ल्ड कपसाठी सज्ज

मनू भाकर-स्वप्नील कुसाळे वर्ल्ड कपसाठी सज्ज

सामना 23 hrs ago

लिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि स्वप्नील कुसाळे यांच्या नेतृत्वाखाली 35 सदस्यीय हिंदुस्थानी नेमबाजी संघ 24 ते 30 मेदरम्यान जर्मनीतील म्युनिक येथे होणाऱ्या नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहे.

रायफल आणि पिस्तूल नेमबाजांसाठी यंदाच्या हंगामातील हा दुसरा नेमबाजी वर्ल्ड कप ठरणार आहे. या विश्वचषकातील प्रत्येक सुवर्णपदक विजेता वर्षअखेरीस इटलीतील रोम येथे होणाऱ्या नेमबाजी विश्वचषक अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक पदकविजेते मनू भाकर आणि स्वप्नील कुसाळे यांच्या पुनरागमनामुळे म्युनिकपूर्वी हिंदुस्थानी संघ अधिक भक्कम झाला आहे. या दोघांनी ग्रॅनाडा येथे झालेल्या हंगामाच्या पहिल्या स्पर्धेत भाग घेतला नव्हता. स्वप्नील कुसाळे दोन वर्षांपूर्वी 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता ठरला होता. आता तो आपल्या आवडत्या प्रकारात पुन्हा मैदानात उतरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana